🕒 1 min read
नवी दिल्ली: दहशतवादी संघटना तालिबानने अफगाणिस्तानवर संपूर्ण ताबा मिळवला आहे. ते आता तिथे सरकार स्थापन करण्यासाठी प्रयत्न करत आहेत. अफगणिस्तानचे नेते देश सोडून पळून गेल्यानंतर तेथील जनता आता भयभीत झाली आहे. अधिकृत माहिती समोर आली नसली तरी सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या व्हिडिओवरून तेथे मोठ्या प्रमाणात हिंसाचार सुरू असल्याचे दिसत आहे.
दरम्यान, तालिबानच्या समर्थनाथ अनेक देश उतरले असून चीन आणि रशिया यासारख्या दिग्गज राष्ट्रांनी तालिबान्यांचे जाहीर कौतूक केले आहे. तर दुसरीकडे भारतीय नेत्यांनी देखील या घडामोडीवर आपल्या प्रतिक्रिया दिल्यात. मात्र, एमआयएम प्रमुख खासदार असदुद्दीन ओवेसी यांनी काही वर्षांपूर्वी संसदेत केलेल्या भाषणाचा अंदाज खरा ठरल्याचे दिसून येत आहे. त्यांनी काँग्रेस सरकारच्या काळात सन २०१३ मध्ये संसदेत केलेल्या एका भाषणाची आठवण करून दिली आहे.
In 2019, I reiterated my concerns regarding the unavoidable truth about #Afghanistan. While Pakistan, US & Taliban were holding talks in Moscow, @PMOIndia was counting the number of times he hugged Trump. We still don’t know what govt’s Afghanistan policy is. 2/3 pic.twitter.com/dLshQnQRsR
— Asaduddin Owaisi (@asadowaisi) August 16, 2021
संसदेत ओवेसी म्हणाले होते की, ‘भारताने तालिबानशी संवाद कायम ठेवायला हवा. या चर्चेच्या माध्यमातून राजकीय हितांचे संरक्षण करायला हवे, असे म्हटले आहे. अफगाणिस्तान आणि तालिबान संघर्षाच्या पार्श्वभूमीवर असदुद्दीन ओवेसी यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. मी तेव्हाच सांगितले होते की, अफगाणिस्तानातील आपल्या हितांच्या रक्षणासाठी भारत सरकारने तालिबानशी राजकीय स्तरावर संवाद सुरू केला पाहिजे. भारताने अफगाणिस्तानात ३ अब्ज डॉलरची गुंतवणूक केली होती. कोणत्याही सरकारने या बाजूकडे लक्ष दिलेले नाही. आता यावर भारत सरकार काय करणार, अशी विचारणा ओवेसी यांनी केली आहे.
महत्त्वाच्या बातम्या
- आगामी टी-२० विश्वचषक स्पर्धेच्या वेळापत्रकाची होणार आज घोषणा
- अफगाणिस्तानच्या प्रसिध्द निर्मातीने मागितले मदतीचे आवाहन
- लॉर्ड्सवर कोहलीचा मोठा विक्रम, वेस्ट इंडिजच्या महान कर्णधाराला टाकले मागे
- केएल राहुलने संपवला 44 वर्षांचा दुष्काळ, अशी कामगिरी करणारे गावस्कर होते पहिले भारतीय सलामीवीर
- ‘जिम-मॉल सुरु झाले, सिनेमांना इतर पर्याय मिळाले…मात्र नाट्यभूमीचं काय ?’
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
