मुंबई: गोव्यातील ‘कॅसिनो’ म्हणजे स्वतंत्र साओ जॅसिंटो बेटेच आहेत. त्या बेटांवर बाहेरच्यांना पाय ठेवता येत नाही, पण या जुगारी बेटांवर फक्त बाहेरच्याच लोकांची वर्दळ आहे व त्या धुंद नशेत ते देश, तिरंगा या सगळ्यांना विसरले आहेत. देशात फक्त असे एकच साओ जॅसिंटो बेट नाही. गोव्यात व देशात अशी बेटे अनेक आहेत. ‘फाळणी’इतकीच या बेटांकडे बघूनही वेदनेची कळ येणे आवश्यक आहे. अशी आठवण करून देत संजय राऊत यांनी मोदींवर निशाना साधला आहे.
स्वातंत्र्यदीनाच्या पर्वाला साओ जॅसिंटो बेटावरील स्थानिकांनी तिरंगा फडकवण्यास विरोध केला होता. यावरूनच संजय राऊत यांनी मोदींवर निशाना साधत जसे मोदींनी भारत-पाकिस्तान फाळणीच्या आठवणी जागृत करून १४ ऑगस्ट हा दिवस ‘फाळणी वेदना स्मृतीदीन’ म्हणून साजरा करण्याचे घोषित केले. तसेच देशात असे अनेक बेटे आहेत. ‘फाळणी’इतकीच या बेटांकडे बघूनही वेदनेची कळ येणे आवश्यक आहे. असे सामनातून म्हटले आहे.
गोव्यातून पोर्तुगीज गेले असले तरी पोर्तुगीजांचा वंश काही ठिकाणी अधूनमधून वळवळत असतो. गोव्यातील काही मंडळी आजही त्यांचा बाप गोव्यात नसून पोर्तुगालात असल्याच्या थाटात वावरत असतात. देशाच्या स्वातंत्र्य दिनी गोव्याच्या भूमीवर जे घडले ते धक्कादायक आहे. गोव्याच्या साओ जॅसिंटो बेटावर तिरंगा फडकविण्यास तेथील स्थानिक लोकांनी विरोध केला. त्याचे तीव्र पडसाद देशभरात उमटल्यावर गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांना हस्तक्षेप करावा लागला. कोणत्याही परिस्थितीत साओ जॅसिंटो बेटावर तिरंगा फडकविला जाईल, असे सावंत यांना ठणकावून सांगावे लागले. गोवा सरकारने हस्तक्षेप केल्यावर कोठे स्वातंत्र्य दिनी तिरंगा फडकविण्याचा कार्यक्रम पार पाडला.
गोव्यात असूनही असंख्य गोवेकर या बेटावर अद्यापि पाय ठेवू शकलेले नाहीत, कारण येथील लोक बाहेरच्या लोकांना येथे पाय ठेवू देत नाहीत. देश, गोवा राज्य, स्वातंत्र्य दिन, प्रजासत्ताक दिन अशा सोहळ्यांशी या बेटाचा संबंध नाही. हे लोक मतदान करतात की नाही? सरकारी सोयी-सवलतीचा लाभ घेतात की नाही? ते कळत नाही. असा सवालदेखील सामनातून करण्यात आला आहे.
गोव्यात अशा अनेक वस्त्या आणि बेटे आहेत की जेथे ड्रग्ज माफियांचाच कारभार चालतो. त्यांचेच सरकार अस्तित्वात आहे व नायजेरिया आणि रशियाचे झेंडे त्यांच्या वस्त्यांवर फडकत आहेत. मुद्रात नांगरून पडलेले हे जुगाराचे अड्डे सरकार व राजकारण्यांचे खिसे गरम करत असतील, पण गोवा नासवून सोडत आहेत. देशात फक्त असे एकच साओ जॅसिंटो बेट नाही. गोव्यात व देशात अशी बेटे अनेक आहेत. ‘फाळणी’इतकीच या बेटांकडे बघूनही वेदनेची कळ येणे आवश्यक आहे. असे सामनातून म्हटले आहे.
महत्त्वाच्या बातम्या
- आगामी टी-२० विश्वचषक स्पर्धेच्या वेळापत्रकाची होणार आज घोषणा
- अफगाणिस्तानच्या प्रसिध्द निर्मातीने मागितले मदतीचे आवाहन
- लॉर्ड्सवर कोहलीचा मोठा विक्रम, वेस्ट इंडिजच्या महान कर्णधाराला टाकले मागे
- केएल राहुलने संपवला 44 वर्षांचा दुष्काळ, अशी कामगिरी करणारे गावस्कर होते पहिले भारतीय सलामीवीर
- ‘जिम-मॉल सुरु झाले, सिनेमांना इतर पर्याय मिळाले…मात्र नाट्यभूमीचं काय ?’
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

