Share

परभणीमध्ये दोन पोलिसांचे कोरोनाच्या संसर्गाने निधन

Published On: 

परभणी : पोलीस मुख्यालयात कार्यरत असलेले दोन पोलिस कर्मचाऱ्याचे बुधवारी पहाटे कोरोनाने उपचारादरम्यान निधन झाले आहे. ग्रामीण पोलिस ठाण्यातील ४९ वर्षीय पोलिस कर्मचारी तसेच पोलिस मुख्यालयातील ५४ वर्षीय एसआय यांना कोरोनाची लागण झाली हाेती. परंतू कोराना संसर्गावरील उपचारादरम्यान दोघांचेही निधन झाले आहे.

बुधवारी सकाळी साडेडहाच्या सुमारास ग्रामीण पोलिस ठाण्यात कार्यरत असलेल्या पोलिसाचे उपचारादरम्यान निधन झाले. अवघ्या काही तासांच्या अंतराने दोन कोरोनायोद्धा पोलिसांच्या निधनामुळे पोलिस दलामध्ये भीतीचे वातावरण तयार झाले आहे. ग्रामीण पोलिस ठाण्यात कार्यरत असलेले 49 वर्षीय पोलिस कर्मचारी हे परभणी येथील कोविड सेंटरमध्ये उपचारासाठी दाखल झाले होते. त्यांच्यावर नियमीतपणे उपचार सुरू होते. मात्र, उपचारादरम्यान बुधवारी सकाळी सादेदहाच्या सुमारास त्यांचे निधन झाले असल्याची माहिती पोलिसांच्या सुत्रांनी दिली आहे. दरम्यान, आज पहाटे पोलिस मुख्यालयातील सहाय्यक फौजदार (एएसआय) म्हणून कार्यरत असलेले 54 वर्षीय पोलिस कर्मचाऱ्याचे कोरोनाच्या उपचारादरम्यान निधन झाले.

पोलिस कर्मचारी तसेच पोलिस अधिकाऱ्यांना कोरोना संसर्गाची लागण होत आहे. पोलिस कर्मचारी तसेच अधिकारी हे कोरोनाच्या काळामध्ये नियमीतपणे बंदोबस्ताची ड्यूटी बजावत आहेत. त्यामुळे त्यांच्या जेवणासह इतर आरोग्य प्रश्न, समस्येबाबत तपासणी करायला वेळ मिळत नाही. त्यामुळे सर्व पोलिस कर्मचारी तसेच अधिकारी यांनी स्वत:ची नियमीतपणे आरोग्य तपासणी तसेच रक्त चाचण्या करुन घ्यावे असे आवाहन जिल्हा पोलिस अधिक्षक यांनी केले आहे.

महत्त्वाच्या बातम्या   

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!