Share

कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत मुडिजच्या अंदाजामुळे भारतीय अर्थव्यवस्थेला दिलासा

Published On: 

नवी दिल्ली: कोरोना काळात जगातील सर्वच देशांच्या अर्थव्यवस्थावर विपरीत परिणाम घडून येत आहेत. यामध्ये भारतीय अर्थव्यवस्था देखील अपवाद नाही. साध्य देखील देशातील अनेक राज्यांमध्ये तोरणाच्या दुसर्या लाटेच्या पार्श्वभूमीवर टाळेबंदी करण्यात आली आहे. यामध्ये सन २०२० मध्ये कोरोना संकटामुळे भारताचा ‘जीडीपी’ उणे ८ टक्क्यांपर्यंत घसरला होता.

दरम्यान आंतरराष्ट्रीय नाणेनिधीनंतर आता वित्त क्षेत्रातील दिग्गज संस्था मूडीजनं दिलेल्या अंदाजामुळे आर्थिक आघाडीवरून दिलासादायक बातमी आहे. त्यामुळे एकीकडे देशात कोरोनाची दुसरी आणि भीषण लाट आलेली असताना भारतीय अर्थव्यवस्थेला दिलासा मिळाला आहे.

मुडिजने सांगितल्या प्रमाणे ‘कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा परिणाम अर्थव्यवस्थेवर दिसून येईल. मात्र तरीही मागील वर्षातल्या आर्थिक घडामोडींच्या तुलनेत जीडीपी वाढीचा वेग दोन आकडी असेल,’ असा अंदाज मूडीजनं व्यक्त केला आहे. कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावाचा परिणाम यावर्षीदेखील दिसेल, असंही मूडीजनं पुढे म्हटलं आहे.

त्याचबरोबर या संकटाचा सामना करण्यासाठी देशव्यापी लॉकडाऊन करण्याऐवजी लहान-लहान कंटेन्मेंट झोन तयार करण्यात यावे, असा सल्ला मूडीजनं दिला आहे. लहान-लहान कंटेन्मेंट झोन तयार केले गेले, तर अर्थव्यवस्थेला बसणारा फटका गेल्या वर्षीच्या तुलनेत कमी असेल, भारतातील कोरोना मृत्यूदर कमी आहे. याशिवाय तरुण लोकसंख्या जास्त असल्यानं कोरोना संकटाचा सामना करताना भारताला फायदा होईल. जीडीपी वाढीचा वेग दुहेरी आकड्यात असेल, असा अंदाज मूडीजनं वर्तवला आहे.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!