मुंबई : राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख अखेर सीबीआयसमोर हजर झाले आहेत. ते डीआरडीओ गेस्ट हाऊसवर दाखल झाले आहेत. त्यांच्यावर पोलीस अधिकाऱ्यांना खंडणी वसूल करण्याचे आदेश दिल्याचा आरोप आहे. त्यामुळे त्यांची आज चौकशी होत आहे. या आरोपामुळेच देशमुखांना मंत्रिपद सोडावं लागलं होतं. देशमुख आजच्या चौकशीला कसे उत्तर देतात, यावर देशमुखांचे पुढील भवितव्य अवलंबून आहे.
दरम्यान, अनिल देशमुख यांना सीबीआयनं समन्स पाठवलं होत. मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी केलेल्या आरोपांवर आज (14 एप्रिल ) चौकशी करण्यात येत आहे. अनिल देशमुख यांच्या स्वीय सहायकांची रविवारी चौकशी करण्यात आली होती. या अगोदर मुंबई उच्च न्यायालयात दिलासा न मिळाल्याने माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली होती. उच्च न्यायालयाने या प्रकरणी सीबीआय चौकशीची परवानगी दिली होती. मात्र सर्वोच्च न्यायालयाकडूनही देशमुख यांना दिलासा मिळाला नव्हता. सर्वोच्च न्यायालयाने राज्य सरकार आणि अनिल देशमुख यांच्या याचिका फेटाळून लावल्या होत्या. त्यावेळी देशमुख यांच्यावर झालेल्या भ्रष्टाचाराच्या आरोपांची स्वतंत्र चौकशी करण्याची गरज असल्याचं सर्वोच्च न्यायालयाने सांगितले होते.
अनिल देशमुख यांच्यावर झालेल्या भ्रष्टाचाराच्या आरोपाची प्राथमिक चौकशी व्हावी असा आदेश मुंबई उच्च न्यायालयाने दिला होता. त्यानंतर देशमुख यांनी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली. मात्र उच्च न्यायालयाच्या आदेशात हस्तक्षेप करण्यास सर्वोच्च नकार दिला. १५ दिवसांमध्ये सीबीआयने प्राथमिक अहवाल सादर करावा, असे निर्देश उच्च न्यायालयाने दिले होते. त्यानुसार, सीबीआयने चौकशी सुरू केली आहे. आता या चौकशीतून काय समोर येतय याकडे संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागले आहे.
महत्वाच्या बातम्या
- कोरोनाचा कहर : उपराष्ट्रपती आणि पंतप्रधान आज विविध राज्यांच्या राज्यपालांशी संवाद साधणार
- ‘माझी मैना गावावर राहिली’, अण्णाभाऊंच्या गीताचे विडंबन; अजय-अतुल विरोधात परभणीत तक्रार
- सुर्यकुमार यादवच्या हेलिकॉप्टर शॉटवर हार्दिक फिदा!
- आज रात्रीपासून राज्यात सर्वत्र संचारबंदी, नियमांचा भंग केल्यास होणार कठोर कारवाई
- जालना; खाजगी कंपन्यांच्या टॉवरला रेंज मिळेना, मोबाईलधारक वैतागले!
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

