Share

कोरोनाचा कहर : उपराष्ट्रपती आणि पंतप्रधान आज विविध राज्यांच्या राज्यपालांशी संवाद साधणार

Published On: 

नवी दिल्ली-  देशातल्या वाढत्या कोरोना प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर उपराष्ट्रपती एम व्यंकय्या नायडू आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी आज सर्व राज्यांचे राज्यपाल आणि नायब-राज्यपाल यांच्याशी दूरदृष्य प्रणालीच्या माध्यमातून संवाद साधणार आहेत. देशात कोरोनाचा प्रादुर्भाव सुरू झाल्यापासून पंतप्रधान सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांशी वेळोवेळी संवाद साधत आहेत. गेल्या आठवड्यातच पंतप्रधानांनी सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांशी संवाद साधून कोरना परिस्थिती आणि लसीकरणाचा आढावा घेतला होता.

दरम्यान, देशभरात काल 1 लाख 61 हजार 736 नवे कोरोनाबाधित आढळून आले. नवबाधीतांची संख्या कालही, महाराष्ट्रातच सर्वाधिक होती. आतापर्यंत देशातले 1 कोटी 22 लाख 53 हजार 697 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. देशात सध्या 12 लाख 64 हजार 698 रुग्णांवर उपचार सुरू आहेत. तर मृतांची एकंदर संख्या 1 लाख 71 हजार 58 झाली आहे.

राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढतोच आहे; काल तब्बल 60 हजार 212 नवबाधितांची नोंद झाली; तर 31 हजार 624 रुग्ण कोरोनामुक्त झाले. त्यामुळे उपचाराधीन रुग्णांची संख्या वाढली असून सध्या राज्यात 5 लाख 93 हजार 42 रुग्ण उपचार घेत आहेत.

महत्वाच्या बातम्या 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!