Share

कर्नाळा बँक घोटाळ्याचा तपास अंमलबजावणी संचलनालयाकडे जाणार…

Published On: 

मुंबई : पनवेल तालुक्यातील कर्नाळा नागरी सहकारी बँकेत कामकाजात गैरव्यवहार झाला होता. यामध्ये विशेषतः शेतकरी बांधवांच्या ठेवी आहेत. मात्र बँक घोटाळ्यानंतर इतक्या महिन्यात बँकेचे अध्यक्ष तथा शेकापचे माजी आमदार विवेक पाटील यांनी ठेवीदार व खातेदारांची देणी न देता त्यांना वेठीस धरल्याने हे प्रकरण आणखी चिघळले आहे.

यामध्ये विवेक पाटील यांच्यासह संचालक, अधिकारी अशा ७६ जणांविरोधात एफआयआर दाखल केला आहे. मात्र अद्याप त्यांच्यावर अटकेची आणि मालमत्ता जप्तीची कारवाई होत नसल्याने हे प्रकरण आता अंमलबजावणी संचलनालयाकडे (ईडी) दिले आहे.

याआधी देखील विधानभवनात व्हीडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत कर्नाळा सहकारी बँक ठेवीधारकांना न्याय देणे, अवैध खासगी सावकारीवर नियंत्रण, ग्रामीण भागातील शेतीमालाचे गोदाम बांधकामबाबत सहकारी बँक व सहकार विभागाची भूमिका या विषयावर सविस्तर चर्चा करण्यात आली होती. त्याचबरोबर आ . प्रशांत ठाकूर , आ . महेश बालदी , आ . आशिष शेलार , आ . समीर कुणावार, आ . अमित साटम यांनी विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात तारांकित प्रश्न दाखल करून शासनाचे लक्ष केंद्रित केले होते. त्यामुळे आता तरी या प्रकरणात ठेवीदारांना न्याय मिळणार का याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

महत्वाच्या बातम्या 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!