Share

अफगाणिस्तानातून परतलेल्या १४६ भारतीयांपैकी दोघांना कोरोनाची लागण

Published On: 

नवी दिल्ली : अफगाणिस्तानवर तालिबानने ताबा घेतल्यानंतर भारतीयांना मायदेशी परत आणण्यासाठी प्रयत्न करत आहे. १४६ भारतीयांना कतारच्या राजधानीतून वेगवेगळ्या ४ विमानांतून भारतात परत आले आहेत. या १४६ भारतीयांपैकी २ जणांना कोरोनाची लागण झाल्याचे निदर्शनास आले आहे.

अफगाणिस्तानच्या राजधानीतून आपल्या नागरिकांना बाहेर काढण्याच्या प्रयत्नामध्ये भारताने रविवारी ३ उड्डाणांमधून २ अफगाणी खासदार आणि ३९२ लोकांना परत आणलं आहे. सोमवारी भारतात आलेल्या भारतीयांपैकी दोघांना कोरोनाची लागण झाल्याची माहिती मिळाली आहे.

दोहाहून मायदेशात परतलेल्या भारतीयांच्या दोन तुकड्यापैकी १०४ लोकांना विस्तारा विमानाने, ३० कतार एअरवेजने आणि ११ इंडिगो विमानाने भारतात परत आणण्यात आलं.

दरम्यान, एकीकडे देशातील कोरोनाचं सावट संपत नसताना अफगाणिस्तानमधील दहशतवादी घटनेनंतर आता कोरोना अफगाणिस्तानमधून भारतात आल्याने भीती व्यक्त केली जात आहे. देश सोडण्यासाठी एअरपोर्टवर हजारो लोकांनी गर्दी केली आहे. महिलांवर इतकी दहशत आहे की, सगळीकडे भीतीचं वातावरण तयार झालं आहे. मोठ्या संख्येने अफगाणिस्तानातील अडकलेले भारतीय पुन्हा मायदेशी परतत आहेत.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!