अफगाणिस्तान : तालिबानने अफगाणिस्तान ताब्यात घेतल्यानंतरही अमेरिकेन सैन्य अफगाणिस्तानमध्ये आहे. ३१ ऑगस्टनंतरही तुमचं सैन्य अफगाणिस्तानमध्ये राहिल्यास त्याचे परिणाम अमेरिकेवर होतील, अशा शब्दांत तालिबानने अमेरिकेला धमकावलं आहे. सैन्य हटवण्यासाठी ३१ ऑगस्टची शेवटची मुदत तालिबानने अमेरिकेला दिली आहे. दरम्यान, अफगाणिस्तानमध्ये अडकलेल्या अमेरिकन नागरिकांना बाहेर काढण्यासाठी अमेरिकन सैनिक काबूलमध्ये राहू शकतात, असे काही दिवसांपूर्वी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांनी म्हणाले होते.
दरम्यान, तालिबानने काबूलमधून हजारो अफगाणी नागरिक आणि परदेशी लोकांच्या निर्वासनासाठी अमेरिकेला जबाबदार धरले होते. ‘अमेरिका, त्यांच्या सर्व शक्ती आणि सुविधांसह काबूल विमानतळावर सुव्यवस्था राखण्यात अपयशी ठरली आहे. केवळ काबूल विमानतळ सोडता संपूर्ण देशात शांतता आहे,’असे तालिबानचे अधिकारी अमीर खान मुताकी म्हणाले होते.
दरम्यान, सध्या काबूल विमानतळ सुरक्षित करण्यासाठी हजारो अमेरिकन सैनिक प्रयत्न करत आहेत. अफगाणिस्तानमधून बाहेर देशातील नागरिकांचे स्थलांतर ३१ ऑगस्ट पर्यंत पूर्ण करण्याचा त्यांचा प्रयत्न आहे. अफगाणिस्तानमध्ये जवळजवळ १५ हजार अमेरिकन आणि ५० ते ६० हजार अफगाणी नागरिक अडकले असून त्यांना बाहेर काढायचे आहे.
महत्त्वाच्या बातम्या
- ‘पुजारा किंवा रहाणेच्या जागी सुर्यकुमारला तिसऱ्या कसोटीत संधी द्यावी’,- फारुख इंजिनीयर
- गुन्हे मागे ; बैलगाडा मालकांनी जल्लोषात केला गृहमंत्री वळसे पाटलांचा सत्कार
- मोठी बातमी : मंत्रालयाबाहेर विष पिऊन आत्महत्येचा प्रयत्न करणारे शेतकरी सुभाष जाधव यांचा मृत्यू
- शहरात लसीकरणाला प्रतिसाद ; पावणे सात लाख जणांचे लसीकरण
- गंभीर! कोरोनाची तिसरी लाट; पुढील महिन्यात दोन लाख आयसीयू बेड तयार ठेवा’, निती आयोगाच्या सूचना
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

