कोल्हापूर : महापूरामध्ये नुकसान झालेल्या शेतकऱ्यांसाठी राज्य सरकारने जाहीर केलेली मदत ही तुटपुंजी असून ती देखील मिळत नसल्याने शेतकरी हे उध्वस्त झाले आहेत, असा संताप व्यक्त करत आज स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी यांनी कोल्हापूर जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढला होता. यावेळी त्यांनी, मदतीचे असलेले निकष तात्काळ बदलावे आणि तातडीने शेतकऱ्यांना भरीव मदत करावी, अशी मागणी केली.
आजच्या मोर्चात हजारो शेतकरी हे सामील झाले होते. दरम्यान, त्यांनी राज्य सरकारला टोकाचा इशारा देतानाच जलसंपदा मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्यावर देखील निशाणा साधला. ‘जे सूर्याला दिसत नाही ते जयंत पाटील यांना दिसतं. मोठ्या योजना आणून टेंडर काढण्यातच राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांना रस आहे,’ असा गंभीर आरोप राजू शेट्टी यांनी केलाय.
‘कृष्णा, पंचगंगा नदीतील महापुराचं पाणी बोगद्यातून दुष्काळी भागाकडे वळवण्याच्या घोषणा ही निव्वळ धूळफेक आहे. अशा मोठ्या योजना आणून पैसे खाण्याचा हा उद्योग आहे. जयंत पाटील यांची ही योजना कधीच पूर्ण होणार नाही,’ अशी टीका देखील शेट्टी यांनी केलीये. पुढे त्यांनी, ‘पूरग्रस्त शेतकऱ्यांचे पुनर्वसन करणार आहात की नाही? रस्ते करण्यासाठी चौपटीने पैसे देता मग पूरग्रस्तांना पैसे का देत नाही?’ असा सवाल महाविकास आघाडीला करत संताप देखील व्यक्त केलाय.
महत्त्वाच्या बातम्या
- ‘तुमचे सैन्य अफगाणिस्तानात थांबले तर..’ तालिबानची अमेरिकेला धमकी
- २०२२ दिल्ली निवडणुकांसाठी भाजपाचे दोन दिवसीय चिंतन शिबिर
- ‘दहीहंडीसाठी कोरोनाचा बाऊ कशाला? ; दहीहंडी साजरी करणाऱ्या मंडळांच्या पाठीशी मनसे उभी राहणार’
- श्रुती मराठेचा साडीमधील सुंदर लुक चाहत्यांच्या पसंतीस
- अफगाणिस्तानवर चर्चा करण्यासाठी पंतप्रधान मोदींनी सर्वपक्षीय बैठक
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

