🕒 1 min read
नवी दिल्ली : अफगाणिस्तान येथे तालिबान्यांनी ताबा मिळविला आहे. सध्या तालिबान यांच्यावर जगभरात चर्चा सुरु आहे. त्यातच आता तालिबानने सत्तास्थापनबाबत एक मोठा निर्णय घेतला आहे. अनेक देशांनी तालिबानला पाठींबा दिल्याचे कळते आहे. याच पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी परराष्ट्र मंत्रालयाला सांगितले की, संसदेच्या दोन्ही सभागृहातील सर्व राजकीय पक्षातील खासदारांना अफगाणिस्तानशी निगडीत सर्व घटनाक्रमाची माहिती द्यावी.
परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांनी ट्विट करुन हे सांगितले आहे. पंतप्रधान मोदी यांनी परराष्ट्र खात्याला निर्देश दिलेत की, संसदेच्या दोन्ही सभागृहातील राजकीय पक्षांच्या खासदारांना अफगाणिस्तानच्या परिस्थितीची माहिती द्यावी. याबाबत पुढील माहिती संसदीय कार्यमंत्री प्रल्हाद जोशी यांच्याकडून दिली जाईल असं त्यांनी सांगितले.
In view of developments in Afghanistan, PM @narendramodi has instructed that MEA brief Floor Leaders of political parties.
Minister of Parliamentary Affairs @JoshiPralhad will be intimating further details.
— Dr. S. Jaishankar (@DrSJaishankar) August 23, 2021
अफगाणिस्तानमध्ये अडकलेले भारतीय काबूल विमानतळावर जमा होत असून आता त्यांनी परत मायदेशी आणण्यासाठी दररोज दोन विमानांच्या उड्डाणांना अमेरिकेकडून परवानगी देण्यात आली आहे. काबूल विमानतळावर सध्या अमेरिकेचे सैन्य तैनात आहे. त्याच्यामार्फत अफगाणिस्तानमध्ये अडकलेल्या नागरिकांना पुन्हा भारतात आणले जात आहे.
दरम्यान, सद्यस्थितीस अफगाणिस्तानमधून अमेरिका आणि नाटो सैन्याद्वारे रोज २५ विमाने उड्डाण घेत आहेत. अमेरिकेची मुख्य उद्देश अफगाणिस्तानमध्ये अडकेलेल्या आपल्या नागरिकांना आणि अफगाणिस्तानमधील ज्या नागरिकांना देश सोडायचा आहे, त्यांना वाचविण्यात येत आहे. तसेच सैन्य दलाच्या विमानांद्वारे नागरिकांना काबूल विमानतळावरून बाहेर काढले जात आहे.
महत्त्वाच्या बातम्या
- ‘तुमचे सैन्य अफगाणिस्तानात थांबले तर..’ तालिबानची अमेरिकेला धमकी
- गुन्हे मागे ; बैलगाडा मालकांनी जल्लोषात केला गृहमंत्री वळसे पाटलांचा सत्कार
- मोठी बातमी : मंत्रालयाबाहेर विष पिऊन आत्महत्येचा प्रयत्न करणारे शेतकरी सुभाष जाधव यांचा मृत्यू
- शहरात लसीकरणाला प्रतिसाद ; पावणे सात लाख जणांचे लसीकरण
- गंभीर! कोरोनाची तिसरी लाट; पुढील महिन्यात दोन लाख आयसीयू बेड तयार ठेवा’, निती आयोगाच्या सूचना
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
