जालना: जिल्ह्यात लॉकडाऊनमुळे ऑनलाईन फसवणूकीचे प्रमाण वाढत आहे. बँकेतून बोलतोय, तुमचे कार्ड बंद पडले, सुरू करण्यासाठी मोबाईलवर आलेला क्रमांक सांगा, अशी वेगवेगळी कारणे सांगून ओटीपीच्या साह्याने शहरातील पाच ग्राहकांची दोन लाख ५ हजार ३८० रुपयांची फसणूक झाली. याबाबत सायबर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केल्यानंतर सायबर टीमने तांत्रिक पध्दतीने तपास करत संबंधितांची रोख रक्कम परत मिळवून दिली आहे.
जालन्यात लॉकडाऊन काळात ऑनलाईन फसवणूकीचे गुन्हे मोठ्या प्रमाणात वाढले आहेत. असाच प्रकार शहरातील गितांजली कॉलनीमधील डॉ. एजाज अहमद खान यांच्यासोबत काही दिवसांपूर्वी घडला होता. एसबीआय बँकेतून बोलत असून, तुमचे क्रेडिट कार्ड बंद करण्याची विनंती प्राप्त झाली आहे. त्यासाठी तुमच्या मोबाईलवर आलेला ओटीपी क्रमांक सांगा, असे सांगून एका सायबर भामट्याने डॉ. खान यांच्या खात्यातून ३३ हजार ९६८ रुपये हडप केले होते. असाच प्रकार शहरातील प्राजक्ता कुलकर्णी, मदन बोराडे, निवास फटिंग, संदीप भालमोडे यांच्यासोबत घडला. पाचही तक्रारदारांची मिळवून २ लाख ५ हजार ३८० रुपयांची रक्कम सायबर गुन्हेगारांची हडप केली होती. याबाबत संबंधितांनी सायबर पोलीस ठाण्यात रितसर तक्रार दाखल केली होती. सायबर पोलिसांनी प्राप्त तक्रारींच्या आधारे गुन्हा नोंदवून एक्सपर्टच्या मदतीने तांत्रिक पध्दतीने तपास केला.रक्कम हडप करणाऱ्यांची माहिती घेऊन हडप केलेली रक्कम परत मिळवली. सदर रक्कम तक्रारदारांना परत करण्यात आली आहे.
ऑनलाईन भसवणूकीच्या जाळ्यात नागरिक पडत आहे, नागरिकांना बँकेतून बोलतो, लॉटरी लागली, फोनपे कॅशबॅक, केवायसी अपडेट, ऑनलाईन गेम, रिवार्डस यासारख्या ऑनलाईन अमिषाला बळी न पडता, आपल्या बँक खात्याची माहिती कुणालाही देऊ नये, असे आवाहन सायबर पोलिसांच्यावतीने करण्यात आले आहे. पोलीस अधीक्षक विनायक देशमुख आणि त्यांच्या सहकारी टीमने सायबर सेलच्या मदतीने पैसे परत मिळवून दिल्याने तक्रारदारांनी आभार मांडले आहे.
महत्वाच्या बातम्या
- लातुरात कोरोना बाधितांचा आकडा ५४० वर!
- उस्मानाबादेत पहिला डोस झालेल्यांनाच मिळणार दुसरा डोस!
- ‘राजीव सातव यांच्या निधनाने बहुजन आणि वंचित समाजाचे फार मोठं नुकसान’
- परभणी मनपाचा ढिसाळ कारभार, उमेदवारांच्या मुलाखती अचानकपणे केल्या रद्द!
- उस्मानाबादेत भक्तनिवास येथील रुग्ण ऑक्सिजनच्या प्रतीक्षेत
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

