Share

लातुरात कोरोना बाधितांचा आकडा ५४० वर!

Published On: 

लातूर: जिल्ह्यात कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे तसेच त्यातून बरे होणाऱ्यांची संख्या देखील लक्षणीय आहे. रविवार कोरोना पॉझिटिव्ह रूग्णांची संख्या ५४० पर्यंत खाली आली असली तरी मृत्यूचा आकडा मात्र फुगल्याचे दिसत आहे. आज ३५ जणांचा मृत्यू झाला. सध्या कोरोना विषाणूचे सावट आणखी घोंगावत असून, मृत्यू आकडा खाली येण्याची गरज आहे. रविवारी लातूर जिल्ह्यात आरटीपीसीआर टेस्टमध्ये ३३० तर रॅपिड अँटिजेन टेस्टमध्ये २१० असे मिळून ५४० कोरोना पॉझिटिव्ह रूग्ण सापडले आहेत.

रविवारी आरटीपीसीआर एकूण टेस्ट ११९१ तर रॅपिड अँटिजेन टेस्ट १५१० झाल्या. एवढ्या टेस्टमधून ५४० रूग्ण पॉझिटिव्ह आढळले. लातूर जिल्ह्यात आजवर ८४ हजार ४९३ कोरोना पॉझिटिव्ह रूग्ण सापडले असले तरी यातील उपचाराने ७५ हजार ०७४ रूग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. रविवारी १२६९ रूग्ण बरे होऊन आपापल्या घरी गेले आहेत. सध्या होम आयसोलेशनमध्ये ४५५८ रूग्ण उपचार घेत आहेत. सध्या रूग्णालयात ३१३० रूग्ण उपचार घेत असून, लातूर जिल्ह्यात आतापर्यंत १७३१ रूग्ण दगावले आहेत.

शनिवारी ३५ रूग्णांचा कोरोना विषाणूची लागण होऊन मृत्यू झाला. हा मृत्यूचा आकडा खाली येण्याची गरज असून, अलीकडे चार, पाच दिवसांपासून पॉझिटिव्ह रूग्णांची संख्या कमी होताना दिसत असली तरी ती आणखी खाली येण्याची आवश्यकता असून, यासाठी लॉकडाऊन केले आहे. जिल्हाधिकाऱ्यांनी लॉकडाऊन आणखी १ जूनपर्यंत वाढविले आहे. सध्या लातूर जिल्ह्यामध्ये बाधित रुग्णांची दुरुस्त होणाऱ्यांची संख्या उल्लेखनीय असून येथून पुढे रुग्ण संख्या आणखी कमी व्हावी, अशी अपेक्षा असली तरी यासाठी लातूर जिल्ह्यातील सर्व नागरिकांचे सहकार्य अपेक्षित आहे.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!