उस्मानाबाद: तुळजाभवानी मंदिर संस्थानने ३० लाख खर्चून १४५ बेडला ऑक्सिजन सुविधा उपलब्ध केली. यापैकी केवळ ५-६ ऑक्सिजन बेड कार्यान्वित आहेत. तसेच अनेक रुग्णांना ऑक्सिजन बेड मिळत नसताना ऑक्सिजन सिलिंडरअभावी १२४ भक्त निवास येथील जवळपास १४० ऑक्सिजन बेड पडून असल्याचे उघडकीस आले. केवळ ५-६ ऑक्सिजन बेड कार्यान्वित असून उर्वरित ऑक्सिजन बेड लक्षणे नसलेल्या कोरोना रुग्णांसाठी वापरण्यात येत आहेत.
गेल्या आठवड्यात ७ मे रोजी पालकमंत्री शंकरराव गडाख यांच्या उपस्थितीत १२४ भक्त निवासमधील ऑक्सिजन सुविधेचा शुभारंभ झाला. त्यानंतर तब्बल आठ दिवसानंतरही प्रशासन आवश्यक ऑक्सिजन सिलिंडर उपलब्ध करू न शकल्याने ऑक्सिजन बेड पडून आहेत. यामुळे रूग्णांना खासगी रूग्णालयात लाखो रुपये खर्चावे लागत असून प्रशासनाने तातडीने ऑक्सिजन सिलिंडर उपलब्ध करण्याची मागणी होत आहे.
१४५ बेडसाठी किमान १५० ते २०० ऑक्सिजन सिलिंडरची गरज असून अपूऱ्या सिलिंडरमुळे १४५ ऑक्सिजन बेडपैकी केवळ ५-६ ऑक्सिजन बेड कार्यान्वित आहेत. तर उर्वरित १४० ऑक्सिजन बेड धुळ खात पडून आहेत. यावर तहसीलदार व नोडल ऑफिसर सौदागर तांदळे यांना विचारले असता ते म्हणाले, आपल्या तालुक्यात सध्या ऑक्सिजन बेडची आवश्यकता नाही. उपजिल्हा रूग्णालयात सध्या बेड शिल्लक आहेत. मात्र तिसऱ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर आपण भक्त निवासातील बेडची व्यवस्था केलेली आहे. ऑक्सिजन साठाही सध्या शिल्लक आहे. सौदागर तांदळे, तहसीलदार तथा नोडल ऑफिसर.
महत्वाच्या बातम्या
- ‘मोदीजी, आमच्या मुलांची व्हॅक्सिन परदेशात का पाठवली?, आता मलाही अटक करा’
- ‘महाराष्ट्राने आज तरुण नेतृत्व, संसदरत्न राजीवजी सातवांना गमवले’, विनायक मेटेंनी व्यक्त केल्या भावना
- लॉकडाऊनमुळे लग्नाच्या १३ वर्षानंतर पहिल्यांदाच पती-पत्नीप्रमाणे राहता आले; अभिनेत्री नीना गुप्ताने सांगितला अनुभव
- औरंगाबादेत शिवसेना-एमआयएमच्या वादात प्रलंबित राहिलेल्या ‘या’ कामास मिळाली गती!
- संकटात भर : चक्रीवादळाचा कोकणासह मुंबईतील ऑक्सिजन प्रकल्पांना धोका; सतर्कतेचे आदेश
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

