मुंबई : काँग्रेस खासदार तसेच शांत स्वभावाचे नेता अशी ओळख असलेले राजीव सातव यांचं निधन झालं आहे. पुण्यातील रुग्णालयात गेल्या काही दिवसांपासून त्यांच्यावर उपचार सुरु होते. कोरोनामुक्त झाल्यानंतर राजीव सातव यांना इतर आजारांनी ग्रासलं होतं. शनिवारी त्यांना न्युमोनियाची लागण झाल्याची माहिती समोर आली होती. पुण्यातील जहांगीर हॉस्पिटलमध्ये राजीव सातव यांच्यावर उपचार सुरु होते. उपचारादरम्यान त्यांचं निधन झालं.
राजीव सातव यांच्या निधनाने बहुजन, वंचित आणि शोषित वर्गाचे मोठं नुकसान झाले असल्याचे मत रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे (खरात) राष्ट्रीय अध्यक्ष सचिन खरात यांनी माडले आहे. यावेळी ते म्हणाले कि, ‘राजीव सातव यांच्यासारख्या सर्वसामान्य तरुणाला सत्तेपर्यंत पोहचविण्याचं काम कॉंग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी केलं पण त्यांच्या जाण्याने स्वप्न भंग झाले आहे. राजीव सातव यांचे आणि माझे संबंध विधानसभा निवडणुकीत आले त्यावेळेस नागपूर येथे नाना पटोले यांच्या प्रचारदरम्यान मला त्यांनी बहुजन आणि वंचित, शोषित समाजाच्या प्रश्नासाठी आंदोलने करतो म्हणून कौतुकाची पाठीवर थाप मारली होती आणि मला सांगितले की लवकरच तुमची आणि राहुल गांधीजी यांची भेट घालून देणार आहे.’ असे ते यावेळी म्हणाले आहेत.
काँग्रेस कमिटीचे सदस्य आणि राज्यसभा सदस्य राजीव सातव हे कोरोनाची लागण झाल्याने काही दिवसांपासून आजारी होते. नुकताच त्यांचा कोरोना रिपोर्ट निगेटिव्ह आला होता. पण न्युमोनियाचा संसर्ग झाल्याने प्रकृती पुन्हा खालवली होती. न्यूमोनियासोबतच त्यांच्या शरीरात सायटोमॅगीलो हा नवा व्हायरस सापडला होता. मागील २३ दिवसांपासून राजीव सातव आजाराशी लढत होते. पण रविवारी त्यांची झुंज संपली.
महत्त्वाच्या बातम्या
- ‘आधी पेट्रोल आणि आता खतांच्या दरात वाढ ! केंद्र सरकार शेतकऱ्यांचे कंबरडे मोडण्याचे काम करतंय’
- सरकारची पोलखोल करण्यासाठी भाजप नेमणार कायदेतज्ज्ञांची समिती : चंद्रकांत पाटील
- ‘मराठा आंदोलने होऊ नये म्हणून कोरोनाचे निर्बंध, भाजप आंदोलनात भाग घेणार’
- ‘डिअर राजीव, वुई विल मिस यू’, सुप्रिया सुळेंच्या ‘त्या’ व्हिडिओची चर्चा
- औरंगाबादेत शिवसेना-एमआयएमच्या वादात प्रलंबित राहिलेल्या ‘या’ कामास मिळाली गती!
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

