Share

परभणी मनपाचा ढिसाळ कारभार, उमेदवारांच्या मुलाखती अचानकपणे केल्या रद्द!

Published On: 

परभणी : महानगरपालिका प्रशासनाने ९ पदांच्या तात्पुरत्या स्वरुपात कंत्राटी पध्दतीने भरतीकरीता बोलाविलेल्या उमेदवाराच्या मुलाखती अचानकपणे गुंडाळल्या होत्या. परंतु प्रहार जनशक्ती संघटनेने तीव्र आक्षेप नोंदवून आंदोलनाचा इशारा दिल्यानंतर मनपा प्रशासनाद्वारे उमेदवारी अर्ज स्वीकारण्यास सुरुवात झाली आहे.

कोरोना विषाणूच्या वाढत्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर महानगरपालिका कार्यक्षेत्रात साथरोगाच्या प्रतिबंधात्मक उपाययोजनांची प्रभावी अंमलबजावणी करीता मनपा प्रशासनाने ९ पदांसाठी निव्वळ तात्पुरत्या स्वरुपात कंत्राटी पध्दतीने तीन महिन्यांच्या कालावधीकरीता मानधन तत्वावर भरतीची जाहिरात दिली होती. या जाहीरातीतील इच्छुक उमेदवारांनी प्रत्यक्ष मुलाखतीस २९ एप्रिल ते १५ मे या कालावधीत दोन फोटो व शैक्षणिक कागदपत्रांसह त्यांच्या साक्षांकित संच प्रति सह महानगरपालिका कार्यालयात आरोग्य विभागात कार्यालयीन वेळेत उपस्थित रहावे, असे नमूद केले होते.

हॉस्पिटल मॅनेजर, स्टाफ नर्स, एक्सरे टेक्नीशियन, इसीजी टेक्नीशियन, फार्मासिस्ट, स्टोअर ऑफिसर, डाटाएन्ट्री ऑपरेटर, वार्ड बॉय या ९ पदांकरिता महापालिका प्रशासनाकडे मोठ्या प्रमाणावर अर्ज दाखल होवू लागले. विशेषतः शहरासह जिल्ह्यातील शेकडो सुशिक्षित बेरोजगारांना या अनुषंगाने शैक्षणिक पात्रतेसंदर्भात कागदपत्रांची जूळवाजूळव सुरु केली. यातच महापालिका प्रशासनाने ७ मे रोजी कार्यालयासमोर एक नोटीस झळकावून अर्ज स्विकारणे व प्रत्यक्ष मुलाखतीचा कार्यक्रम बंद करण्यात येत आहे, असे जाहीर केले.

मनपा प्रशासनाच्या या प्रकाराने इच्छुक उमेदवार अक्षरशः हादरले. अचानक बंद केलेल्या या मुलाखतींबाबत उमेदवारांनी विचारणा केली, तेंव्हा प्रशासनाने मोठ्या प्रमाणावर उमेदवारी अर्ज दाखल केल्यामुळेच मुलाखतीची प्रक्रिया बंद करत आहोत, असे या नोटीस द्वारे नमूद केले. यामुळे उमेदवारांत तीव्र संताप उसळला होता. दरम्यान, महानगरपालिका प्रशासनाने अचानकपणे मुलाखतीची प्रक्रिया बंद केल्याबद्दल प्रहार जनशक्ती पक्षाचे जिल्हाप्रमुख शिवलिंग बोधने, युवा आघाडी प्रमुख गजानन चोपडे, शहरप्रमुख पिंटू कदम यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे सादर केलेल्या एका निवेदनाद्वारे तीव्र संताप व्यक्त केला होता.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!