उस्मानाबाद: जिल्ह्यात कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लसीकरण सुरु आहे तसेच आता ज्यांचा पहिला डोस झाला आहे त्यांना दुसरा डोस देण्यात येणार आहे. कोविशिल्ड लसीचा पहिला डोस होऊन ८४ दिवस झालेल्या नागरिकांना दुसरा डोस देण्याची तयारी करण्यात आली असून, सोमवारी जिल्हा तसेच उपजिल्हा व ग्रामीण रूग्णालयात एकूण ९ ठिकाणी लसीकरण करण्यात येणार आहे. पहिला डोस घेऊन ८४ दिवस झालेल्या जिल्ह्यातील २०८३ नागरिकांनाच ही लस दिली जाणार असून, अन्य नागरिकांनी केंद्रांवर गर्दी करू नये, असे आवाहन जिल्हा लसीकरण अधिकाऱ्यांनी केले आहे.
केंद्र शासनाच्या मार्गदर्शक सूचना बदलल्याने जिल्ह्यातील लसीकरणाची प्रक्रिया दोन दिवसांपासून बंदच आहे. आता कोविशिल्ड लसीचा दुसरा डोस घेण्यासाठी पहिल्या डोसनंतर किमान ८४ दिवसांचे अंतर असणे आवश्यक आहे. हा कालावधी पूर्ण झालेले म्हणजे २२ फेब्रुवारीपूर्वी पहिला डोस घेतलेले व दुसरा डोस देय असलेले जिल्ह्यात २०८३ नागरिक असून, त्यांच्यासाठी सोमवारी जिल्हा शासकीय रूग्णालय,तुळजापूर, उमरगा, परंडा आणि कळंब उपजिल्हा रूग्णालय तसेच लोहारा, वाशी व भूम ग्रामीण रूग्णालयात लसीकरण सुरू राहणार आहे.
उस्मानाबादच्या पोलिस रूग्णालयात केवळ न्यायालयीन अधिकारी, कर्मचाऱ्यांसाठीचे लसीकरण सुरू असेल. सकाळी ९ ते सायंकाळी ५ या वेळेत हे लसीकरण सुरू असून, शक्यतो पहिला डोस घेतलेल्या ठिकाणीच दुसरा डोस घेण्यासाठी नागरिकांनी जावे, सोबत आधार कार्ड किंवा नोंदवलेले ओळखपत्र न्यावे. तसेच लसीकरणासाठी नागरिकांनी गर्दी करू नये, असे आवाहन जिल्हा लसीकरण अधिकारी डॉ. कुलदीप मिटकरी यांनी केले आहे.
महत्वाच्या बातम्या
- ‘राजीव सातव यांच्या निधनाने बहुजन आणि वंचित समाजाचे फार मोठं नुकसान’
- परभणी मनपाचा ढिसाळ कारभार, उमेदवारांच्या मुलाखती अचानकपणे केल्या रद्द!
- ‘आधी पेट्रोल आणि आता खतांच्या दरात वाढ ! केंद्र सरकार शेतकऱ्यांचे कंबरडे मोडण्याचे काम करतंय’
- उस्मानाबादेत भक्तनिवास येथील रुग्ण ऑक्सिजनच्या प्रतीक्षेत
- ‘मोदीजी, आमच्या मुलांची व्हॅक्सिन परदेशात का पाठवली?, आता मलाही अटक करा’
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

