बीड: जिल्ह्यातील शिरूर इथल्या शासकीय वसतिगृहात शासनाचे कोविड केअर सेंटर सुरु करण्यात आले आहे. मात्र आता हे वेगळ्या कारणामुळे चर्चेत आले आहे. आपल्याला काहीच त्रास नाही असं समजत या कोविड केअर सेंटरमधून तब्बल २२ कोरोनाबाधित पळून गेल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे. येथील व्यवस्थापनाची नजर चुकवून एक एक करत तब्बल २२ रुग्ण पळून गेल्याने एकच खळबळ उडाली आहे.
आपल्याला काहीच त्रास नसताना पॉझिटिव्ह म्हणून कोरोना सेंटरमध्ये ठेवले, असा गैरसमज धरून सेंटरमधून व्यवस्थापनाची नजर चुकवून एक एक करत तब्बल २२ कोरोनाबाधितांनी पळ काढल्याचे शिरूरमध्ये समोर आले. इतके रुग्ण पळून जाईपर्यंत सेंटर व्यवस्थापनाचे दुर्लक्ष कसे होते हा प्रश्न आहे. या प्रकरणी डॉ. विजय राठोड यांनी पोलिस स्टेशनला गुन्हा शनिवारी दाखल करण्यात आला आहे. मात्र येथील कोविड केअर सेंटरमधील निष्काळजीपणा समोर आला आहे.
शिरूर येथे शासकीय वसतिगृहात शासनाचे कोविड केअर सेंटर आहे. इथे लक्षणे नसलेले अथवा सौम्य लक्षणे असलेल्या कोरोनाबाधितांवर उपचार केले जातात. १४ ते २१ मे या कालावधीत या सेंटरमधून २२ बाधित रुग्णांनी व्यवस्थापनाला पत्ता लागू न देता पळ काढला. सेंटरच्या गलथान कारभारामुळे हा प्रकार उशिरा लक्षात आला. १४ तारखेपासून बाधित रुग्ण पळून गेले तरी कोणाला पत्ताही लागला नाही. आता हे बाधित इतरत्र फिरून बाकींच्यानाही संसर्ग करण्याची शक्यता आहे.
महत्वाच्या बातम्या
- “मोर्चा काढणार म्हणजे काढणार, तुम्ही परवानगी द्या नाहीतर नका देऊ!”, आ. मेटेंचा इशारा
- ‘पंतप्रधान मोदींना वाटतं मराठा आरक्षण हा राज्याचा विषय, त्यामुळेच ते संभाजीराजेंना भेटले नाहीत’
- अमृता सिंगसोबत साखरपुड्यानंतर मोडले होते रवी शास्त्री यांचे लग्न
- ‘राज्य सरकार आमच्यामुळे आहे, सरकारमुळे आम्ही नाही’, काँग्रेसचा सेना, राष्ट्रवादीला इशारा
- उत्तर प्रदेश हे आता ‘नाथांचे नसून अनाथांचे राज्य’
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

