🕒 1 min read
मुंबई : भारतातील कोरोना परिस्थीतीमुळे आयपीएल स्पर्धा अर्ध्यातच स्थगित करण्यात आली. ही स्पर्धा अर्ध्यातच स्थगित झाल्याने अनेक क्रिकेट चाहत्यांचा हिरमोड झाला. यानंतर क्रिकेट रसिकांचे लक्ष हे जागतीक कसोटी चॅम्पीयनशीप स्पर्धेच्या आंतिम सामन्याकडे लागले.
भारत आणि इंग्लंड यांच्यात ऑगस्ट-सप्टेंबरमध्ये पाच सामन्यांची कसोटी मालिका खेळली जाईल. या वर्षाच्या सुरुवातीला विराट कोहलीच्या नेतृत्वात टीम इंडियाने इंग्लंडला घरच्या मैदानावर पराभूत केले. इंग्लंडच्या फलंदाजांकडे अक्षर पटेल आणि आर अश्विन यांच्यासमोर एकाही नव्हता. 4 सामन्यांची कसोटी मालिका टीम इंडियाने 3-1 ने जिंकली. विराट ब्रिगेडला हा फॉर्म इंग्लंडमध्येही सुरू ठेवायचा आहे. आता टीम इंडिया इंग्लंडच्या दौऱ्यावर जाणार आहे. या दौऱ्यात वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपची फायनल आणि इंग्लंड विरुद्ध पाच टेस्टची मालिका होणार आहे. या दौऱ्यापूर्वी रोहितला त्याचे लहानपणीचे कोच दिनेश लाड यांनी इशारा दिला आहे.
लाड यांनी ‘स्पोर्ट्सकीडा’ शी बोलताना सांगितले की, ‘या वर्षाच्या सुरुवातीला ऑस्ट्रेलियामध्ये रोहितने सर्वांचे लक्ष वेधून घेतले होते. तो फास्ट बॉलर्सच्या विरुद्ध चांगली बॅटींग करत होता. त्याचा खेळ पाहून तो आऊट होणार नाही, असं वाटत होतं. मात्र त्यानं काही इनिंगमध्ये खराब शॉट खेळून विकेट फेकली. त्यानं इंग्लंडमध्ये ही चूक करु नये. त्यामुळे टीमचे नुकसान होईल.’
लाड यावेळी बोलताना म्हणाले की, ‘त्याला इंग्लंडमध्ये अधिक फोकस करावा लागेल. त्याने प्रत्येक बॉल त्याच्या मेरिटप्रमाणे खेळणे आवश्यक आहे. कारण, इंग्लंडमध्ये बॉल जास्त स्विंग होतो. त्यानं इंग्लंड विरुद्ध टर्निंग पिचवर खूप चांगली खेळ केला होता. त्या पिचवर अन्य बॅट्समनना बराच त्रास झाला. रोहित इंग्लंडमधील परिस्थितीनुसार खेळ करेल, असा मला विश्वास आहे.’
महत्वाच्या बातम्या
- ‘पंतप्रधान मोदींना वाटतं मराठा आरक्षण हा राज्याचा विषय, त्यामुळेच ते संभाजीराजेंना भेटले नाहीत’
- अमृता सिंगसोबत साखरपुड्यानंतर मोडले होते रवी शास्त्री यांचे लग्न
- ‘राज्य सरकार आमच्यामुळे आहे, सरकारमुळे आम्ही नाही’, काँग्रेसचा सेना, राष्ट्रवादीला इशारा
- उत्तर प्रदेश हे आता ‘नाथांचे नसून अनाथांचे राज्य’
- मोदींच्या अश्रूंची खिल्ली उडवणार्यांवर बरसली कंगना, म्हणाली…
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

