🕒 1 min read
औरंगाबाद : कोरोना संकटावर मात करण्यासाठी प्रभावी शस्त्र म्हणून देशात कोरोना लस देण्यात येत आहे. मात्र, औरंगाबादमधील दोन डॉक्टरांना कोरोना लस घेतल्यानंतरही कोरोना संसर्ग झाला आहे. १६ जानेवारीपासून सुरू झालेल्या कोरोना लसीकरणादरम्यान लसीचा दुसरा डोस देण्यास सुरूवात झालेली असताना या वृत्तामुळे नागरिक चिंता व्यक्त करत आहेत.
जिल्हा प्रशासनाच्या वतीने औरंगाबादेत १६ जानेवारीपासून कोरोना लसीकरणाला सुरूवात करण्यात आली होती. यामध्ये २८ दिवसांनंतर दुसरा डोस देण्यासही सुरूवात करण्यात आली आहे. मात्र, असे असताना पहिला डोस घेतलेल्या दोन डॉक्टरांना कोरोना संसर्ग झाला आहे.
या संदर्भात महानगर पालिकेच्या वैद्यकीय अधिकारी डॉ. नीता पाडळकर यांनी स्पष्टीकरण देखील दिले आहे. त्यांच्यानुसार लसीचे दोन्ही डोस घेतल्यानंतर १४ दिवसांनी शरीरात अँटिबॉडी तयार होतात. त्यात ज्या डॉक्टरांना कोरोना संसर्ग झाला आहे, त्यांच्यामध्ये सौम्य स्वरुपाची लक्षणे आहेत. यावरून त्यांच्यावर लसीचा परिणाम झाला असल्याचे दिसून येते. त्यामुळे कोणतीही शंका न बाळगता सर्वांनी कोरोना लस घेण्याचे आवाहनही त्यांनी केले आहे.
महत्त्वाच्या बातम्या
- पंतप्रधान मोदींनी ताटं वाजवायला लावून देशात अवदसा आणली – नाना पटोले
- कोल्हापुरातील अंबाबाईच्या दर्शनाची वेळ कमी होण्याची शक्यता !
- ‘ज्यांचे नगरसेवक मोजायला हाताची बोटं पुरेशी आहेत, अशांनी महानगरपालिका बरखास्त करण्याची मागणी करणे हास्यास्पद’
- ‘काँग्रेसनं संविधान सांभाळलं म्हणून चहावाला देशाचा पंतप्रधान झाला’
- कोटीच्या कोटी उड्डाणे : टॉप-५ बोलींमध्ये भारताचा केवळ एक खेळाडू


