Share

कोटीच्या कोटी उड्डाणे : टॉप-५ बोलींमध्ये भारताचा केवळ एक खेळाडू

Published On: 

चेन्नई : आयपीएलच्या आगामी पर्वासाठी खेळाडूंचा लिलाव हा आज पार पडत आहे. या बोली प्रक्रियेआधी सर्व फ्रँचायजीने आपल्या ताफ्यातील रिलीज आणि रिटेन खेळाडूंची यादी जाहीर केली आहे. यामध्ये अनेक संघांनी मोठ्या आणि अनुभवी खेळाडूंना रिलीज केलं आहे. यामुळे इतर फ्रँचायजींमध्ये या खेळाडूंना खरेदी करण्यासाठी रस्सीखेच पाहायला मिळत आहे.

आज अनेक दिग्गज खेळाडूंचा लिलाव झाला तर काही खेळाडू ‘अनसोल्ड’ म्हणजेच विकले गेले नाहीत. विशेष बाब म्हणजे आयपीएलच्या इतिहासात सर्वात मोठी बोली आज लावली गेली. दक्षिण आफ्रिकेचा अष्टपैलू खेळाडू क्रिस मॉरिस याच्यासाठी तब्बल १६.२५ कोटी रुपयांची बोली लावण्यात आली आहे. केवळ ७५ लाख इतकी बेस प्राईज असलेल्या मॉरिस साठी १६.२५ कोटी मोजण्यात आले आहेत. आयपीएलच्या इतिहासात लिलावामध्ये सर्वात मोठी बोली लावलेली ही किंमत आहे. १६.२५ कोटी रुपये मोजत राजस्थान रॉयल्सने आपल्या ताफ्यात जमा केलं आहे.

यानंतर नंबर लागतो न्यूझीलंडच्या काईल जेमिसनचा. हा देखील अष्टपैलू खेळाडू असून त्याला आरसीबी म्हणजेच रॉयल चॅलेंजर्स बेंगलोरने १५ कोटी रुपयांमध्ये खरेदी केलं आहे. ऑस्ट्रेलियाचा धडाकेबाज खेळाडू ग्लेन मैक्सवेल याची २ कोटी इतकी बेस प्राईज होती. त्याला आपल्या संघात समाविष्ट करण्यासाठी चेन्नई सुपर किंग्ज आणि रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर यांच्यात रस्सी खेच चांगलीच रंगली होती. यानंतर, तब्बल १४.२५ कोटी रुपये इतक्या किंमतीवर आरसीबीने खरेदी केलं.

ऑस्ट्रेलियन गोलंदाज झे रिचर्डसन (jhye richardson) याला पंजाब किंग्जने १४ कोटी रुपयांमध्ये खरेदी केलं आहे. आजच्या लिलावामध्ये सर्वाधिक किंमतीत बोली लावलेल्या टॉप-५ खेळाडूंमध्ये भारताच्या एकमेव खेळाडूचा समावेश आहे. हा खेळाडू म्हणजे कृष्णप्पा गौथम ! अष्टपैलू गौथमला चेन्नई सुपर किंग्जने ९.२५ कोटी मोजत आपल्या संघात समाविष्ट केलं आहे.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!