🕒 1 min read
भंडारा : गेल्यावर्षी देशभरात कोरोनाने हाहाकार माजवला होता. या रोगावर प्रतिबंध घालण्यासाठी देशभरात टाळेबंदी लावण्यात आली होती. लॉकडाऊन करण्याआधी देशभरात ‘जनता कर्फ्यू’ लागू करण्यात आला होता. कोरोना योद्धांचा सन्मान व देशभरात एकतेची भावना निर्माण व्हावी यासाठी जनता कर्फ्यू पार पडल्यानंतर नागरिकांनी नियम पाळून टाळ्या-थाळ्यांसह शंखनाद करून प्रतिसाद देण्याच आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलं होतं. याच्यावरून काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी नरेंद्र मोदींवर टीकास्त्र सोडलं आहे.
नाना पटोले यांनी केंद्र सरकारसह पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर जोरदार टीकास्त्र सोडलं आहे. ‘कोरोनासाठी ताटं वाजवायला लावले. त्याने कोरोना गेला का? पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ताटं वाजवायला लावून देशात अवदसा आणली.’ अशी बोचरी टीका नाना पटोले यांनी केली आहे. ‘बाबासाहेबांनी दिलेलं संविधान काँग्रेसनं सांभाळलं म्हणून चहावाला देशाचा पंतप्रधान झाला. मी काँग्रेसचा प्रदेशाध्यक्ष होऊ शकलो .’ असा घणाघात देखील त्यांनी नरेंद्र मोदींवर केली आहे.
केंद्र सरकार विरोधात काँग्रेसची पदयात्रा !
महाराष्ट्र काँग्रेस प्रदेशाध्यक्षपदाचा कारभार स्वीकारताच नाना पटोले हे आक्रमक झाल्याचं दिसून येत आहे. सुमारे अडीच महिन्यांपासून केंद्र सरकारच्या नव्या कृषी कायद्यांविरोधात शेतकऱ्यांचं दिल्लीच्या सीमेवर आंदोलन सुरु आहे. काँग्रेससह विविध पक्षांनी व संघटनांनी या आंदोलनाला पाठींबा दिला आहे.
दुसरीकडं, गेल्या काही दिवसांपासून इंधनांच्या दरात सातत्याने वाढ होत आहे. काही शहरांमध्ये पेट्रोलने शंभरी पार केल्याचं समोर आलं आहे. यामुळे सामन्यांच्या खिशावर आर्थिक बोजा वाढत आहे. केंद्र सरकारला शेतकरी आंदोलन व महागाईच्या मुद्द्यावरून घेरण्यासाठी काँग्रेसने आक्रमक भूमिका घेतली असून आज भंडाऱ्यात पद यात्रेचं आयोजन करण्यात आलं होतं.
महत्त्वाच्या बातम्या
- ‘कसोटीगिरी’ साठी नावाजलेल्या पुजाराचं तब्बल ७ वर्षांनी आयपीएलमध्ये पुनरागमन !
- प्रीती झिंटाच्या पंजाबने ‘शाहरुख खान’ला केलं आपल्या संघात शामिल !
- ‘सरकारच्या आशीर्वादाने पोलीस पूजा चव्हाण केस दाबण्याचा प्रयत्न करत आहेत’
- ‘काँग्रेसनं संविधान सांभाळलं म्हणून चहावाला देशाचा पंतप्रधान झाला’
- कोटीच्या कोटी उड्डाणे : टॉप-५ बोलींमध्ये भारताचा केवळ एक खेळाडू
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

