🕒 1 min read
कोल्हापूर : महाराष्ट्रात कोरोना रुग्णांचे प्रमाण कमी झाल्यानंतर हळूहळू लॉकडाऊनमध्ये शिथीलता करण्यात आली. त्यामुळे कोरोना संदर्भातील सर्व नियम पाळून राज्यात सर्व काही पूर्ववत होत आहे. पण काही जण कोरोना संदर्भातील नियम पाळत नसल्यामुळे आता कोरोना रुग्णाचे प्रमाण वाढताना दिसत आहे.
सध्या कोरोनाचं संकट महाराष्ट्रामध्ये पुन्हा एकदा डोकं वर काढत असताना दिसतंय. राजकीय पक्षांचे कार्यक्रम, लग्न समारंभ, सार्वजनिक ठिकाणी नागरिकांकडून कोरोना प्रतिबंधक नियमांचे सर्रास उल्लंघन होताना दिसत आहे. यामुळेच महाराष्ट्रामध्ये पुन्हा एकदा कोरोनाचे रुग्ण वाढताना दिसून येत आहे.
कोरोना रुग्णांच्या संख्येवर वेळीच नियंत्रण मिळवण्यासाठी महाराष्ट्र शासन वेळीच सावध झाल्याचं दिसून येत आहे. यामुळेच काही जिल्ह्यांमध्ये पुन्हा संचारबंदी व टाळेबंदी करण्यात येत आहे. गेल्या वर्षाच्या अखेरीस टाळेबंदीनंतर मंदिरे खुली करण्यात आली होती. तर, सलग सुट्ट्यांच्या काळात भाविकांच्या गर्दीमुळे कोरोनाचा वाढणारा धोका लक्षात घेता अनेक मंदिरे व पर्यटन स्थळे पर्यटकांसाठी बंद करण्यात आले होते.
आता पुन्हा एकदा कोरोनाचा प्रसार वाढत असल्याने सार्वजनिक ठिकाणी होणारी गर्दी कमी करण्यासाठी नियोजन केले जात आहे. याच मुले कोल्हापुरतील करवीरनिवासिनी अंबाबाईच्या दर्शनाच्या वेळेत देखील कपात करण्यात येण्याच्या शक्यता आहेत. तसे संकेत पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीचे अध्यक्ष महेश जाधव यांनी दिले आहेत. राज्यात वाढत्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मंदिर समिती कठोर निर्णय घेण्याचा तयारीत असल्याचे सांगण्यात येत आहे. दर्शनाची वेळ कमी करायची की नाही यावर आगामी दोन दिवसांत निर्णय होणार आहे.
महत्त्वाच्या बातम्या
- पंतप्रधान मोदींनी ताटं वाजवायला लावून देशात अवदसा आणली – नाना पटोले
- १०० युनिट वीज बिल माफ करणार, असं आपण सांगितलंच नव्हतं, उर्जामंत्र्यांचा दावा
- यंदाच्या शिवजयंतीची मानाची मिरवणूक रद्द
- ‘काँग्रेसनं संविधान सांभाळलं म्हणून चहावाला देशाचा पंतप्रधान झाला’
- कोटीच्या कोटी उड्डाणे : टॉप-५ बोलींमध्ये भारताचा केवळ एक खेळाडू
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

