Share

‘काँग्रेसनं संविधान सांभाळलं म्हणून चहावाला देशाचा पंतप्रधान झाला’

Published On: 

भंडारा : महाराष्ट्र काँग्रेस प्रदेशाध्यक्षपदाचा कारभार स्वीकारताच नाना पटोले हे आक्रमक झाल्याचं दिसून येत आहे. सुमारे अडीच महिन्यांपासून केंद्र सरकारच्या नव्या कृषी कायद्यांविरोधात शेतकऱ्यांचं दिल्लीच्या सीमेवर आंदोलन सुरु आहे. काँग्रेससह विविध पक्षांनी व संघटनांनी या आंदोलनाला पाठींबा दिला आहे.

दुसरीकडं, गेल्या काही दिवसांपासून इंधनांच्या दरात सातत्याने वाढ होत आहे. काही शहरांमध्ये पेट्रोलने शंभरी पार केल्याचं समोर आलं आहे. यामुळे सामन्यांच्या खिशावर आर्थिक बोजा वाढत आहे. केंद्र सरकारला शेतकरी आंदोलन व महागाईच्या मुद्द्यावरून घेरण्यासाठी काँग्रेसने आक्रमक भूमिका घेतली असून आज भंडाऱ्यात पद यात्रेचं आयोजन करण्यात आलं होतं.

या पदयात्रेनंतर सभेमध्ये बोलताना काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केंद्र सरकारसह पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर जोरदार टीकास्त्र सोडलं आहे. ‘बाबासाहेबांनी दिलेलं संविधान काँग्रेसनं सांभाळलं म्हणून चहावाला देशाचा पंतप्रधान झाला. नाना पटोले काँग्रेसचा प्रदेशाध्यक्ष होऊ शकले.’ असं भाष्य त्यांनी केलं आहे.

दरम्यान, या सभेतील भाषणावेळी नाना पटोलेंनी केलेल्या आणखी एका विधानाची जोरदार चर्चा होत आहे. ‘‘शेती पंपाचे बिलं दुरुस्त केले जातील. शेती पंपाचं अर्ध बिल माफ करण्यात येईल. वीज बिलाच्या या अर्ध्या पैशात वीजेच्या पायाभूत सुविधा (इन्फ्रास्टक्चर) उभ्या केल्या जातील. काँग्रेसचं सरकार आल्यावर वीजेचं बिल माफ करु, आता आघाडीचं सरकार आहे. लॅाकडाऊनमध्ये आलेलं काही बिल माफ करावं, ही काँग्रेसची भूमिका आहे.’ असं भाष्य नाना पटोले यांनी केलं आहे.’

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!