Share

कंगना रनौतविरोधात राष्ट्रवादी युवतीकडून पोलिसांकडे दोन तक्रारी

Published On: 

🕒 1 min read

पुणे : एका मुलाखतीत देशाच्या स्वातंत्र्याबद्दल बेताल वक्तव्य केल्याप्रकरणी अभिनेत्री कंगना रनौत हिच्याविरुद्ध पुणे सायबर पोलिसांत दोन तक्रारी आल्या आहेत. राष्ट्रवादी युवती काँग्रेसच्या राज्य सरचिटणीस पूजा झोळे आणि सरचिटणीस समीर उत्तरकर यांनी तक्रार दाखल करून गुन्हा दाखल करण्याची मागणी केली.

‘भारताला १५ ऑगस्ट १९४७ साली स्वातंत्र्य मिळाले नव्हते, ती भीक होती. देशाला खरे स्वातंत्र्य २०१४ मध्ये मिळाले’, अशी मुक्ताफळे अभिनेत्री कंगना रनौतने एका कार्यक्रमात उधळली आहेत. कंगनाच्या या वक्तव्यानंतर देशभरातून तिचा निषेध करण्यात येत आहे. तसेच तिला मिळालेले पुरस्कार परत घ्यावेत अशी देखील मागणी होताना दिसत आहे.

तर चित्रपट, कला क्षेत्रात केलेल्या कामगिरीमुळे ८ नोव्हेंबर २०२१ रोजी कंगना रनौत यांचा आपल्या हस्ते पद्मश्री पुरस्कार देऊन गौरव करण्यात आला. कला क्षेत्र वगळता कंगना रणौत या प्रत्येक क्षेत्रात नको त्याठिकाणी आपले नाक खुपसून प्रसिद्धी झोकात राहण्याचा प्रयत्न करत असतात. याच कारणाने प्रसिद्ध सोशल मीडिया ट्विटरने कंगना रणौत यांचे अकाऊंट बंद केले होते, असे राष्ट्रवादी युथ काँग्रेसचे पदाधिकारी अंबादास खैरे यांनी थेट राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांना लिहिलेल्या पत्रात म्हटले आहे.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!