Share

…तर असे साखर कारखाने स्वाभिमानी शेतकरी संघटना चालू देणार नाही- राजू शेट्टी

Published On: 

🕒 1 min read

परभणी : काल(११ नोव्हें.)तालुक्यातील पिंगळी येथे स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने ऊस व सोयाबीन परिषद पार पडली. या परिषदेला जिल्हाभरातून मोठ्या प्रमाणात शेतकरी उपस्थित होते. यावेळी बोलत असतांना शेतकऱ्यांना ‘एफआरपी’नुसार उसाचे पैसे देण्यासंदर्भात साखर कारखान्यांना आठ दिवसाची मुदत दिलेली आहे. जे साखर कारखाने चालू हंगामातील ‘एफआरपी’ जाहीर करणार नाहीत व थकीत रक्कम देणार नाहीत असे साखर कारखाने स्वाभिमानी शेतकरी संघटना चालू देणार नाही, असा इशारा संघटनेचे संस्थापक अध्यक्ष राजू शेट्टी यांनी दिला आहे.

यावेळी शेट्टी म्हणाले की,’जेव्हा सोयाबीनचे दर दहा ते अकरा हजार रुपये क्विंटल होते, तेव्हा शेतकऱ्यांकडे सोयाबीन नव्हते आणि आज शेतकऱ्यांचे सोयाबीन बाजारात आले तर त्याचे दर कोसळले आहेत. याला कारण केंद्र सरकारचे आयातीचे धोरण आहे. केंद्र सरकारने जाणीवपूर्वक सोयापेंड आयात करून सोयाबीनचे बाजार भाव पाडले आहेत. शेतकऱ्यांना लुटण्याचा हा धंदा वर्षांनुवर्षे सुरू आहे. केंद्र सरकारच्या चुकीच्या आयात-निर्यात धोरणामुळे शेतकरी सातत्याने भरडला जात आहे.’

दरम्यान, मराठवाडय़ातील शेतकरी संघटित नसल्यामुळे साखर कारखानदार या शेतकऱ्यांना ‘एफआरपी’ची रक्कम देत नाहीत. शेतकऱ्यांनी संघटित होऊन साखर कारखानदारांवर दबाव वाढविण्याची गरज आहे. पीकविम्याची रक्कम शेतकऱ्यांना आठ दिवसाच्या आत मिळाली पाहिजे, अन्यथा रिलायन्स पीक विमा कंपनीच्या विरोधात शेतकरी आक्रमक भूमिका घेतील, असा इशाराही यावेळी शेट्टी यांनी दिला.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!