मुंबई : एसटी महामंडळाचे राज्य शासनामध्ये विलीनीकरण करावे या मागणीसाठी एसटी कर्मचारी मागील चार दिवसांपासून मुंबईतील आझाद मैदानावर आंदोलन करत आहेत. या आंदोलनात रयत क्रांती संघटनेचे अध्यक्ष सदाभाऊ खोत, भाजप नेते गोपीचंद पडळकर यांच्यासह मोठ्या संख्येने भाजपाचे पदाधिकारी सहभागी झाले आहेत. मात्र अद्याप विलीनीकरणाच्या मागणीवर शासनाने तोडगा काढला नाही. यावर चित्रा वाघ यांनी टिका केली आहे.
ऐन दिवाळीत २ हजार #ST कर्मचा-यांना निलंबित करून त्यांच्या चुली बंद करण्याचं पाप सरकारनं केलंय..
नोकरी घालवणं..
उपाशी मारणं..
बेघर करणं..
आत्महत्येस प्रवृत्त करणं..हाच का #MVA चा कॅामन मिनिमम प्रोग्राम?
हे सरकारच कायमचं निलंबित करण्याची वेळ आलीय#निलंबन_सरकार चा धिक्कार असो!
— Chitra Kishor Wagh (@ChitraKWagh) November 12, 2021
चित्रा वाघ म्हणाल्या, ऐन दिवाळीत २ हजार एसटी कर्मचाऱ्यांना निलंबित करून त्यांच्या चुली बंद करण्याचं पाप सरकारनं केलंय. नोकरी घालवणं. उपाशी मारणं. बेघर करणं. आत्महत्येस प्रवृत्त करणं. हाच का महाविकास आघाडी सरकारचा कॅामन मिनिमम प्रोग्राम? या सरकारला कायमचं निलंबित करण्याची वेळ आलीय. अशी टीका चित्रा वाघ यांनी केली आहे.
दरम्यान एसटी कर्मचाऱ्यांच्या मुंबईतील आझाद मैदानावर सुरु असलेल्या आंदोलनात सर्वच भाजप नेत्यांनी पाठिंबा दर्शविला आहे. रयत क्रांती संघटनेचे अध्यक्ष सदाभाऊ खोत, भाजप नेते गोपीचंद पडळकर हे दोन दिवसांपासून आझाद मैदानावर तळ ठोकून आहेत. आता राज्य सरकार काय निर्णय घेणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
महत्वाच्या बातम्या
- …तर असे साखर कारखाने स्वाभिमानी शेतकरी संघटना चालू देणार नाही- राजू शेट्टी
- हिंदुत्वाची तुलना आयएसआयएसशी करणे चुकीचे- गुलाम नबी आझाद
- ‘काळानुरूप बदलली तरच सहकार चळवळ टिकेल’, गडकरींनी व्यक्त केली अपेक्षा
- कोरोनाविरोधातील लढा अंतिम टप्प्यात, परंतु…- मनसुख मंडाविया
- सुसाइड नोट लिहून काँग्रेस आमदाराच्या मुलाची आत्महत्या


