Share

‘काळानुरूप बदलली तरच सहकार चळवळ टिकेल’, गडकरींनी व्यक्त केली अपेक्षा

Published On: 

मुंबई : काल(११ नोव्हें.)एका कार्यक्रमात बोलत असतांना उद्योग क्षेत्राशी सामना करताना सहकार क्षेत्राने काळानुरूप बदल आत्मसात करायला हवेत. संस्था नफ्यात चालण्यासाठी नवनवीन तंत्रज्ञानाचा उपयोग महत्त्वाचा असून काळासोबत चळवळ चालण्यासाठी राज्य सहकारी बँके ने पुढाकार घ्यायला हवा अशी अपेक्षा केंद्रीय परिवहनमंत्री नितीन गडकरी यांनी व्यक्त केली आहे.

तसेच पुढे ते म्हणाले की,’आत्मनिर्भर देशात कृषी क्षेत्राची वाढ महत्त्वाची असून सहकार चळवळीत काळानुरूप बदल घडण्यासाठी राज्य बँके ने पुढाकार घ्यायला हवा. साखर उद्योग चांगल्या प्रकारे चालण्यासाठी पुण्यासह पश्चिम महाराष्ट्रातील सर्व रिक्षा इथेनॉलवर चालविण्याची सक्ती करावी. यामुळे इथेनॉलला चांगला भाव मिळेल तसेच रिक्षावाल्यांचाही लाभ होईल’ असेही त्यांनी स्पष्ट केले. तसेच बँका, पतसंस्थामध्ये मोठय़ा प्रमाणात पैसा असून त्यांनी राष्ट्रीय महामार्ग विकास प्राधिकरणात गुंतवणूक के ल्यास ७ टक्के परतावा देण्याची ग्वाहीही यावेळी गडकरींनी दिली.

दरम्यान, राज्य सहकारी बँकेच्या शतकोत्तर दशपूर्तीनिमित्त सहकार चळवळीला दिशा देणारे आणि बँके च्या उभारणीत मोलाचे योगदान देणाऱ्या वैकुं ठभाई मेहता, सर विठ्ठलदास ठाकरसी, प्रा. धनंजयराव गाडगीळ यांच्या तैलचित्रांचे अनावरण समारंभात माजी केंद्रीय कृषीमंत्री शरद पवार,केंद्रीय परिवहनमंत्री नितीन गडकरी, सहकारमंत्री बाळासाहेब पाटील, डॉ. नीलम गोऱ्हे, जलसंपदामंत्री जयंत पाटील, गृहमंत्री दिलीप वळसे पाटील, आरोग्यमंत्री राजेश टोपे, सुप्रिया सुळे आदी उपस्थित होते.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!