🕒 1 min read
नवी दिल्ली : काल(११ नोव्हें.)देशातील कोरोनास्थितीचा आढावा घेण्यासाठी केंद्रीय आरोग्यमंत्री मनसुख मंडाविया यांनी राज्यांच्या आरोग्यमंत्र्यांची दूरचित्रसंवाद यंत्रणेद्वारे बैठक घेतली.
यावेळी बोलत असतांना देशाचा कोरोनाविरोधी लढा अंतिम टप्प्यात आहे. परंतु, आणखी काही काळ सावधगिरी बाळगावी लागणार आहे. यामुळे ‘हर घर दस्तक’ या मोहिमेअंतर्गत सर्व प्रौढ नागरिकांच्या लसीकरणावर भर द्यावा, अशी सूचना मंडाविया यांनी दिली आहे.
दरम्यान, पुढे ते म्हणाले की,’लसीकरण आणि नियम पालन हे करोनाविरोधी प्रतिबंधक उपाय आहेत. त्यामुळे लशीच्या ‘सुरक्षा कवचा’पासून कोणीही वंचित राहणार नाही, याची खातरजमा करणे आवश्यक आहे. सध्या १२ कोटी नागरिकांच्या दुसऱ्या लसमात्रेची वेळ झालेली आहे. या नागरिकांना दुसरी लसमात्रा घेण्यासाठी प्रोत्साहन देऊन संपूर्ण लसीकरणाची उद्दिष्टपूर्ती करावी.’
महत्त्वाच्या बातम्या
- …तर असे साखर कारखाने स्वाभिमानी शेतकरी संघटना चालू देणार नाही- राजू शेट्टी
- हिंदुत्वाची तुलना आयएसआयएसशी करणे चुकीचे- गुलाम नबी आझाद
- ‘काळानुरूप बदलली तरच सहकार चळवळ टिकेल’, गडकरींनी व्यक्त केली अपेक्षा
- जोपर्यंत सकारात्मक निर्णय होत नाही, तोपर्यंत मुंबई सोडणार नाही- गोपीचंद पडळकर
- काँग्रेसच्या जितेश अंतापूरकरांनी घेतली आमदारकीची शपथ
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
