Share

हिंदुत्वाची तुलना आयएसआयएसशी करणे चुकीचे- गुलाम नबी आझाद

Published On: 

नवी-दिल्ली : माजी केंद्रीय मंत्री सलमान खुर्शीद यांच्या नवीन पुस्तकातील हिंदुत्वाबाबत केलेल्या वक्तव्यामुळे राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. याच पार्श्वभूमीवर काँग्रेसचे ज्येष्ठ नेते गुलाम नबी आझाद यांनी देखील खुर्शीद यांच्या वक्तव्याबाबत असहमती दाखवत हिंदुत्वाची तुलना आयएसआयएसशी केली जाऊ शकते, हे चुकीचे आहे आणि अतिशयोक्ती आहे,असे म्हंटले आहे.

यासंदर्भात आझाद यांनी ट्विट केले आहे की, ‘हिंदू धर्माच्या मिश्र संस्कृतीपासून वेगळे असलेली राजकीय विचारधारा म्हणून हिंदुत्वाशी आम्ही असहमत असलो, तरी आयएसआयएस आणि जिहादी इस्लामशी हिंदुत्वाची तुलना करणे हे वास्तवात चुकीचे आणि अतिशयोक्ती आहे.’

दरम्यान, यासंदर्भात माध्यमांकडून विचारण्यात आले असता खुर्शीद म्हणाले की,’हिंदू धर्म हा अत्यंत उच्च दर्जाचा धर्म आहे. यासाठी गांधीजींनी जी प्रेरणा दिली, त्याहून मोठी प्रेरणा दुसरी असूच शकत नाही. मी नवीन लेबल का स्वीकारू? कोणी हिंदू धर्माचा अपमान केला तरी मी बोलेन. मी म्हणालो, की जे हिंदुत्वाचे राजकारण करतात ते चुकीचे आहेत आणि आयएसआयएस देखील चुकीचे आहे.’

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!