Share

मस्जिद समोर हॅन्डल लॉक करुन उभी केलेली दुचाकी चोरणाऱ्या दोघांची हर्सुल कारागृहात रवानगी

Published On: 

🕒 1 min read

औरंंगाबाद : मस्जिद समोर हॅन्डल लॉक करुन उभी केलेली दुचाकी चोरणाऱ्या गौसखा कालेखा पठाण (वय ३५, रा. नाणेगांव ता.सिल्लोड) व नवाबखा उस्मानखा पठाण (वय ४०, रा. गोद्री ता. भोकरदन) या दोघांची हर्सुल कारागृहात न्यायालयीन कोठडीत रवानगी करण्याचे आदेश प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी ए.एन. माने यांनी दिले आहेत.

पटेलनगर उस्मान कॉलनीत राहणारे अफरोज सरवर शेख अहेमद शेख (वय ३९) हे मेडीकल चालवतात. सन २०१० मध्ये त्यांनी दुचाकी क्रमांक (एमएच-२०-बीव्ही-३४९१) खरेदी केली होती. मेडीकल मधील औषधी आणण्यासाठी सदरील दुचाकी दुकानात काम करणाऱ्या आमेर कुरेशी याला दिली होती.

१० मे रोजी दुपारी साडेतीन वाजेच्या सुमारास आमेर कुरेशी हा जामा मशिद येथे नमाज पठणासाठी गेला होता. त्यावेळी त्याने मस्जिद समोर हॅन्डल लॉक करुन उभी केलेली दुचाकी चोरट्याने लंपास केली. प्रकरणात सिटीचौक पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!