लातूर: सध्या कोरोनाच्या वाढत्या रुग्णांमुळे सर्वत्र चिंतेचे वातावरण पसरले आहे. एकीकडे कोरोनामुळे रुग्ण व त्यांचे नातेवाईक परेशान आहेत तर दुसरी कडे रुग्णालयांमध्ये वैद्यकीय सुविधा नसल्यामुळे आरोग्य प्रशासनाच्या नाकीनऊ येत आहेत. अशातच ऑक्सिजन तसेच लसींचा पुरवठा देखील कमी असल्याने लातूर जिल्हा मोठ्या संकटात असताना कोरोना रुग्णांना आवश्यक असणाऱ्या रेमेडेसिवीर इंजेक्शनचा काळाबाजार होत असल्याचे उघडकीस येत आहे. याच पार्श्वभूमीवर शहरात रेमेडेसिवीरचा काळाबाजार बाजार करणाऱ्या दोघांना स्थानिक गुन्हे शाखेने अटक केली आहे.
सध्याच्या या चिंतेच्या परिस्थिती काही लोकं रुग्णांच्या नातेवाईकांचा गैरफायदा घेत रेमेडेसिवीर इंजेक्शन जास्त दराने विकत असून काळाबाजार करत असल्याचे प्रकार समोर आले आहेत. असाच प्रकार शहरात घडला आहे, याची माहिती मिळताच पोलीस अधीक्षक निखिल पिंगळे यांनी काळाबाजार करणाऱ्या दोघांवर कार्यवाही करण्याचे आदेश दिले. या अनुषंगाने पोलीस अधीक्षक निखिल पिंगळे, अप्पर पोलीस अधीक्षक हिंमत जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक गजानन भातलवंडे यांच्या नेतृत्वाखाली मागील काही दिवसांपासून रेमेडेसिवीर इंजेक्शनचा काळाबाजार करणाऱ्या इसमांच्या मागावर पोलीस होते.
स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने आंबेडकर चौकाजवळ सापळा रचून काळाबाजार करणाऱ्या या चोरांना पकडले. अनिकेत तेलंगे व ओमकार शेळके यांना ताब्यात घेऊन त्यांच्याकडून दोन रेमडीसीवीर इंजेक्शन्स आणि दोन मोबाईल असा एकूण ३० हजार २०० रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला आहे. हे आरोपी रेमेदेसिविरचे इंजेक्शन गरजू व्यक्तींना २५ हजार रुपयाने विकणार होते तसेच या दोघांसोबत आणखी एका व्यक्तीला पोलिसांनी अटक केली आहे. विवेकानंद चौक पोलीस ठाण्यात या आरोपींवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अशा परिस्थितीमध्ये कोणत्याही व्यक्तीने कोणत्याही औषधांची काळाबाजारी किंवा चढ्या दराने विक्री करू नये, असे आवाहन लातूर जिल्हा पोलिस विभागाच्या वतीने करण्यात येत आहे.
महत्वाच्या बातम्या
- राज्यांच्या तक्रारीची अदार पूनावालांनी घेतली दखल; कोव्हीशील्डच्या किंमतीत घट
- रुग्णालयांनी आपापल्या स्तरावर ऑक्सिजन मॉनिटरिंग करावी- ऑडिट कमिटी
- गैरप्रकार रोखण्यासाठी कोरोना रिपोर्टवर यापुढे ‘क्यूआर कोड’
- पालकमंत्री राजेंद्र शिंगणेंकडून रविंद्र तुपकरांची मागणी मान्य!
- कटकट गेटची ‘कटकट’ आता आयुक्तांच्या दरबारी निकाली निघणार!
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

