Share

पालकमंत्री राजेंद्र शिंगणेंकडून रविंद्र तुपकरांची मागणी मान्य!

Published On: 

बुलडाणा : ग्रामीण भागातील कोरोना रुग्णांची वाढती संख्या आटोक्यात आणून कोरोनाला पायबंद घालण्यासाठी गावागावात कोविड केअर सेंटर तथा आयसोलेशन सेंटर उभारण्यात यावे, अशी मागणी शेतकरी संघटनेचे रविकांत तुपकर यांनी जिल्हाधिकारी एस. रामामूर्ती यांच्याकडे केली होती. पालकमंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे यांनीही तत्काळ मागणीची दखल घेत आयसोलेशन सेंटर उभारण्याचे निर्देश दिले. त्यानुसार जिल्हाधिकाऱ्यांनी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना गावपातळीवर आयसोलेशन सेंटर उभारण्याचे आदेश दिले आहेत.

गावागावात कोविड सेंटर किंवा आयसोलेशन सेंटर उभारणीची जनहिताची मागणी रविकांत तुपकर यांनी रेटून धरली होती. या मागणीची प्रशासनाने तत्काळ दखल घेत त्यांची मागणी मान्य केली. २५ एप्रिल रोजी जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या बैठकीत जिल्हाधिकारी एस. रामामूर्ती यांनी पालकमंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे यांच्याकडे रविकांत तुपकर यांनी केलेल्या मागणीचा प्रस्ताव सादर केला. ही मागणी रास्त असल्याचे सांगत, तातडीने सेंटर उभारा, असे आदेश पालकमंत्र्यांनी दिले.

आदेश मिळताच जिल्हाधिकाऱ्यांनी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी भाग्यश्री विसपुते यांना गावपातळीवर कोरोनाबाधित रुग्णांना आयसोलेशन सुविधा उपलब्ध करून देण्याचे निर्देश दिले. असिम्प्टमॅटिक रुग्णांचे प्रमाण अधिक आहे. या रुग्णांना होम आयसोलेशनचा सल्ला वैद्यकीय यंत्रणेकडून दिला जातो. परंतु अशा प्रकारचे रुग्ण मुक्तसंचार करत असल्याच्या तक्रारी असल्याने समाज मंदिरे, शाळा, मंगल कार्यालये या ठिकाणी आयसोलेशन सेंटरची सुविधा उपलब्ध करावी, असे जिल्हाधिकाऱ्यांनी म्हटले आहे.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!