🕒 1 min read
पुणे : देशात १ मे पासून १८ ते ४४ वयोगटातील सर्वांसाठी देखील लसीकरण सुरु करण्यात येणार आहे. अशातच अनेक ठिकाणी लसींचा तुटवडा निर्माण होत असून आता सीरम इन्स्टिट्यूट आणि भारत बायोटेक या कंपन्यांनी लसींचे नवे दर जाहीर केले आहेत. आधीच आर्थिक पेचात असलेले नागरिक नव्या किंमतींमुळे अधिक पेचात पडले असून लसीकरणामध्ये मोठा अडथळा निर्माण होऊ शकतो.
अनेक राज्यांनी लसींच्या वाढलेल्या किंमतीवर नाराजी व्यक्त केली होती. यानंतर, केंद्र सरकारने या कंपन्यांना लसींच्या किंमती कमी करण्याचे निर्देश दिले होते. दरम्यान, या मागणीला त्वरित प्रतिसाद देऊन सीरम इन्स्टिट्यूटचे सीईओ अदार पुनावाला यांनी राज्यांसाठी कोव्हीशील्ड या लसीची किंमत ४०० रुपयांवरून ३०० रुपये प्रति डोस अशी केल्याची घोषणा केली आहे.
As a philanthropic gesture on behalf of @SerumInstIndia, I hereby reduce the price to the states from Rs.400 to Rs.300 per dose, effective immediately; this will save thousands of crores of state funds going forward. This will enable more vaccinations and save countless lives.
— Adar Poonawalla (@adarpoonawalla) April 28, 2021
‘सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाच्या मानवतेच्या भावनेने राज्यांसाठी प्रति डोस असलेली ४०० रुपयांची किंमत ३०० केल्याची घोषणा करत आहे. हे दर लगेच लागू होतील. याने राज्यांचे हजारो कोटी रुपये वाचतील. तेच यामुळे लसीकरण वाढेल व अमूल्य जीवन देखील वाचेल,’ असं ट्विट अदार पूनावाला यांनी केली आहे.
महत्त्वाच्या बातम्या
- ‘या’ तीन रुग्णालयात फायर सेफ्टी कार्यान्वित, इतर दोन ठिकाणी आढळल्या त्रुटी!
- ‘राष्ट्रवादीत जाऊनही आमदारकी नाही, त्यात आजारपण यामुळे खडसेंच मानसिक संतुलन बिघडलंय’
- याचिका दाखल झाल्यावर खा.सुजय विखे म्हणाले, ‘रेमडेसिवीरचा बाऊ करू नका’
- औरंगाबादेत लसीकरणावर ‘महासंकट’! वारंवार मागणी करुनही शासनाकडून लस देण्यात कुचराई का?
- कसे बसे दोन दिवस बसले तिसऱ्या दिवशी माजलगावात पुन्हा केली गर्दी
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
