Share

गैरप्रकार रोखण्यासाठी कोरोना रिपोर्टवर यापुढे ‘क्यूआर कोड’

Published On: 

अमरावती : अमरावतीत आरटीपीसीआर कोरोना चाचणी केल्यानंतर अमरावतीच्या संत गाडगेबाबा विद्यापीठ प्रयोगशाळेकडून रिपोर्ट हा पीडीएफ स्वरुपात किंवा ऑनलाइन पद्धतीने देण्यात येत होता. यामुळे काहींकडून या मुळ रिपोर्टवर खाडाखोड केल्या जात असल्याचे निदर्शनास आले. यामुळे यापुढे संत गाडगेबाबा प्रयोगशाळेकडून देण्यात येणाऱ्या प्रत्येक कोरोना रिपोर्टवर ‘क्यूआर कोड’ राहणार आहे. मुळ रिपोर्टसोबत छेडछाड केल्यास हा गैरप्रकार उघडकीस येणार आहे.

कोरोना चाचणीसाठी अॅन्टिजेन आणि आरटीपीसीआर अशा दोन पद्धतीचा वापर होतो. आतापर्यंत अमरावतीत आरटीपीसीआर चाचणी केल्यानंतर पीडीएफ स्वरुपात रिपोर्ट दिले जायचे. वास्तविकता अनेकदा या मुळ रिपोर्टमध्ये ‘एडिट’ करुन सफाईने खोडतोड केली गेली आहे. यामध्ये रुग्णाचे नाव बदलवणे, निगेटिव्ह असलेला रिपोर्ट पॉझिटिव्ह करणे किंवा पॉझिटिव्ह असल्यास निगेटिव्ह करणे, असे प्रकार संबधित यंत्रणेच्या निदर्शनास आले आहे.

पण असे प्रकार पूर्णत: रोखण्यासाठी आता रिपोर्ट ऑनलाइन किंवा ऑफलाइन कोणत्याही माध्यमातून घेतल्यानंतर त्यावर क्युआर कोड राहणारच आहे. हा कोड कुठेही स्कॅन केला तर त्यामध्ये ज्या रुग्णांचा जो रिपोर्ट असेल ती संपूर्ण माहिती यावेळी समोर येणार आहे. यासोबतच आता आंतरराष्ट्रीय विमान प्रवासासाठी क्युआर कोड असलेलेच आरटीपीसीआर चाचणीचे रिपोर्ट ग्राह्य धरण्यात येणार आहे.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!