औरंगाबाद : गेल्या अनेक दिवसांपासून कटकटगेट येथील रस्त्याच्या कामात अडथळा निर्माण झाला होता. एकीकडे सिमेंट काँक्रीटचे काम हॉटेल शालीमार पर्यंत झाले आहे. पण कटकटगेट जवळ काही लोकांनी कामात अडथळा आणल्याने हे काम सारखे बंद पडत होते. या पार्श्वभूमीवर मंगळवारी (दि.२७) महापालिकेचे प्रशासक तथा आयुक्त आस्तिककुमार पांडेय यांनी कटकटगेट रस्त्याच्या कामाची पाहणी केली. तसेच भविष्यातील गरज लक्षात घेता या रस्त्याची रुंदी १०० फुटांचीच असावी, अशी मागणी मागणी देखील केली. राज्य सरकारने शहरातील रस्त्यांच्या कामांसाठी १५२ कोटी रुपयांचा निधी दिला आहे.
शासनाच्या १५२ कोटींच्या निधीतून केल्या जाणार्या रस्त्यांच्या कामांत कटकटगेट रस्त्याचाही समावेश आहे. पोलीस मेस पासून येणारा हा रस्ता एका बाजूला शंभर फुटाचा तर दुसर्या बाजूला ऐंशी फुट रुंदीचा आहे. कटकटगेट जवळ या रस्त्याची रुंदी साठ फुट एवढीच केलेली आहे. त्याला स्थानिक नागरिकांचा विरोध केला आहे. भविष्यातील विचार करता हा रस्ता सरसकट १०० फुट रुंदीचाच असावा, अशी मागणी समाजिक कार्यकर्ते शेख सलीम सहारा यांनी केली होती.
कटकटगेट परिसरातील रस्त्याची रुंदी वाढवा, असे त्यांनी पालिकेला सांगितले होते. रुंदी वाढवेपर्यंत रस्त्याचे काम करण्यात येऊ नये, अशी भूमिकाही त्यांनी घेतली होती. त्याची दखल घेत मंगळवारी पालिकेचे आयुक्त पााडेय यांनी या रस्त्याच्या कामाची पाहणी केली. यावेळी त्यांच्याबरोबर शहर अभियंता सखाराम पानझडे, नगररचना विभागाचे सहाय्यक संचालक जयंत खरवडकर व अन्य अधिकारी उपस्थित होते. यावेळी पांडेय यांनी रस्त्यांच्या कामांचे सर्वेक्षण करुन नागरिकांचे म्हणणे ऐकून घेऊन योग्य तो निर्णय घेतला जाईल, असे आश्वासित केले.
महत्त्वाच्या बातम्या
- ‘या’ तीन रुग्णालयात फायर सेफ्टी कार्यान्वित, इतर दोन ठिकाणी आढळल्या त्रुटी!
- स्तुत्य उपक्रम! आयुक्तालयात पोलिसांच्या परीवाराकरिता लसीकरण सुरु
- याचिका दाखल झाल्यावर खा.सुजय विखे म्हणाले, ‘रेमडेसिवीरचा बाऊ करू नका’
- औरंगाबादेत लसीकरणावर ‘महासंकट’! वारंवार मागणी करुनही शासनाकडून लस देण्यात कुचराई का?
- कसे बसे दोन दिवस बसले तिसऱ्या दिवशी माजलगावात पुन्हा केली गर्दी
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

