Share

रुग्णालयांनी आपापल्या स्तरावर ऑक्सिजन मॉनिटरिंग करावी- ऑडिट कमिटी

Published On: 

औरंगाबाद : नाशिक घटनेनंतर तसेच विरार येथील घटनेनंतर औरंगाबाद मनपाने फायर आणि ऑक्सिजन ऑडिट करण्याचा निर्णय घेतला आहे. ऑक्सिजनच्या योग्य व्यवस्थापनासाठी शहरातील रुग्णालयांनी आपापल्या स्तरावर ऑक्सिजन मॉनिटरिंग कमिटी तयार करावी. तसेच ही कमिटी चोवीस तास कार्यरत राहील याचीही दक्षता घ्यावी, अशा सूचना ऑक्सिजन ऑडिट कमिटीने केल्या आहेत. त्यामुळे आता रुग्णालयांना मॉनिटरिंग कमिटी स्थापन करावी लागणार आहे.

औरंगाबाद शहरात कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढतच असल्याने मध्यंतरी कोरोनाबाधितांवर उपचार करण्यासाठी ऑक्सिजनचा मोठा तुटवडा निर्माण झाला होता. तो आता कमी झाला असला तरी समस्या अजून कायम आहे. औरंगाबादप्रमाणेच राज्यातील बहुतेक जिल्ह्यांत ऑक्सीजनचा तुटवडा जाणवत आहे. त्यामुळे विभागीय आयुक्तांनी शहर व जिल्ह्याच्या स्तरावर ऑक्सीजन ऑडिट कमिटी स्थापन करण्याचा निर्णय घेतला. शहरस्तरावर पालिकेला ऑडिट कमिटी स्थापन करण्याचे अधिकार दिले आहेत.

तर जिल्हास्तरावर जिल्हाधिकार्‍यांना हे अधिकार बहाल केले आहेत. त्यामुळे औरंगाबाद शहरासाठी पालिकेचे प्रशासक आस्तिककुमार पांडेय यांनी जिल्हा खनीकर्म अधिकारी अतुल दौड यांच्या अध्यक्षतेखाली ऑक्सीजन ऑडिट कमिटी स्थापन केली. या कमिटीच्या कामाबद्दल दौड यांनी मंगळवारी माहिती दिली की, पालिका आयुक्त पांडेय यांच्या बरोबर २३ एप्रिल रोजी एमजीएम हॉस्पिटल, डॉ. हेडगेवार रुग्णालय, कमननयन बजाज रुग्णालय या तीन दवाखान्यांची पाहणी करून तेथील ऑक्सीजनच्या व्यवस्थेची माहिती जाणून घेतली.

टँकरमधून टाकीमध्ये ऑक्सीजन भरताना गळती होणार नाही. टाकीतून पाईपलाईनच्या माध्यमातून रुग्णापर्यंत ऑक्सीजन पुरवताना देखील गळती होणार नाही, याची खबरदारी घेण्यास दवाखान्यांच्या प्रमुखांना सूचित केले. रुग्णाच्या बेडवर रुग्ण ऑक्सीजनचा मास्क सुरू असतानाही काढून ठेवतात, त्यामुळे देखील ऑक्सीजन वाया जातो, असेही निदर्शनास आले. त्यामुळे हा निर्णय घेतला आहे.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!