लखनौ – उत्तर प्रदेशात दहशतवादविरोधी पथकाने (एटीएस) मोठी कारवाई करीत राजधानी लखनौ शहराबाहेरच्या परिसरातून कुख्यात ‘अल कायदा’चे पाठबळ असलेल्या ‘अन्सार गजवातुल हिंद’ दहशतवादी संघटनेच्या दोन दहशतवाद्यांना काल अटक केली आहे. त्यांच्याकडून स्फोटके आणि शस्त्रास्त्रे जप्त केल्याची माहिती उत्तर प्रदेशचे अतिरिक्त पोलीस महासंचालक (कायदा व सुव्यवस्था) प्रशांत कुमार यांनी येथे सांगितले.
दहशतवाद्यांकडून साखळी बॉम्बस्फोट घडवून आणण्याची योजना होती. त्यांच्याकडून जिवंत बॉम्बसह मोठा शस्त्रसाठा देखील जप्त करण्यात आला. दहशतवाद्यांच्या निशाण्यावर भाजपचे बडे नेते असल्याचे बोलले जात आहे. मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ, भाजपचे प्रदेशाध्यक्ष स्वतंत्र देव सिंह, सुनील बन्सल यांच्यासह अनेक नेते दहशतवाद्यांच्या निशाण्यावर होते. आयबी, एटीएस आणि इंटेलिजेंस टीम चौकशी करत आहेत.
या दशतवाद्यांना अमर अल मंदी याने या दहशतवाद्यांना प्रशिक्षण दिलेले होते. शाहिद नावाच्या व्यक्तीच्या घरात हे दहशतवादी लपून बसून आपला कट रचत होते. याबाबत एटीएसला एका आठवड्यापासून खबर लागली होते. त्यामुळे एक आठवड्यापासून एटीएसची या घरावर नजर होती. दोन-तीन संशयित व्यक्ती या घरात ये-जा करत होते. आज छाप्यादरम्यान 6 ते 7 किलो स्फोटकं जप्त करण्यात आले आहे.
प. उत्तर प्रदेश व्यतिरिक्त हरदोई, सीतापूर, बाराबंकी, उन्नाव आणि रायबरेली या जिल्ह्यांसह लखनऊ आयुक्तालयाच्या हद्दीत दहशतवादी हल्ल्याच्या शक्यतेवरून सतर्कतेचा इशारा देण्यात आलेला आहे. अटक करण्यात आलेले अल कायदाचे दहशतवादी उत्तर प्रदेशमधील लखनऊसह काही जिल्ह्यांमध्ये बॉम्ब स्फोट घडवण्याच्या तयारीत होते. पोलिसांनी दोन प्रेशर कुकर बॉम्बसह बरीच स्फोटके व विदेशी पिस्तूलं देखील जप्त केली आहेत. उत्तरप्रदेश पोलिसांनी आतापर्यंत दोन जणांना अटक केली आहे.
महत्त्वाच्या बातम्या
- ‘या’ तीन युवा खेळाडूंवर प्रभावित सुरेश रैना म्हणाला…
- ‘शाळा अद्याप सुरू करू नयेत, कारण…’ ; आरोग्यमंत्री राजेश टोपेंची भूमिका
- महाराष्ट्रात आज कोरोनाचे ८ हजार ५३५ नवे रुग्ण तर ‘इतके’ रुग्ण कोरोनामुक्त
- ‘नागरिकांनी ‘या’ अफवांवर विश्वास ठेवू नये’, मंत्री अशोक चव्हाण यांचे आवाहन
- ‘…तर खांद्याला खांदा लावून काम करु’; नितेश राणेंच्या भाषणानंतर शिवसेना नेत्याने थोपटली पाठ


