मुंबई : दिवसभरात महाराष्ट्रात कोरोनाचे ८ हजार ५३५ नवे रुग्ण आढळल्यामुळे आतापर्यंतच्या राज्यातील कोरोनाबाधितांची संख्या ६१ लाख ५७ हजार ७९९ झाली. राज्यातील कोरोना रुग्णांपैकी ६ हजार १३ जण दिवसभरात बरे झाल्यामुळे राज्यातील बरे झालेल्या कोरोना रुग्णांची संख्या ५९ लाख १२ हजार ४७९ झाली. सध्या महाराष्ट्रात १ लाख १६ हजार १६५ कोरोना अॅक्टिव्ह रुग्ण आहे.
राज्यात झालेल्या ४ कोटी ४० लाख १० हजार ५५० कोरोना चाचण्यांपैकी ६१ लाख ५७ हजार ७९९ पॉझिटिव्ह आल्या. कोरोनामुळे राज्यात ५ लाख ९६ हजार २७९ जण होम क्वारंटाइन तर ४ हजार ७७२ जण संस्थात्मक क्वारंटाइनमध्ये आहेत. कोरोनामुळे महाराष्ट्रात दिवसभरात १५६ मृत्यू झाले. यामुळे राज्यात आतापर्यंत कोरोनाने झालेल्या मृत्यूची संख्या १ लाख २५ हजार ८७८ झाली.
राज्यातील कोरोना रुग्णांपैकी ३ हजार २७७ जणांचा इतर कारणाने मृत्यू झाल्याचे राज्य शासनाने सांगितले. महाराष्ट्राचा मृत्यूदर २.०४ टक्के, पॉझिटिव्हिटी रेट १३.९९ टक्के, रिकव्हरी रेट ९६.०२ टक्के आहे.
कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमुळे मार्च महिन्यापासून राज्यात पुन्हा निर्बंध कडक केल्यानंतर मुंबई लोकलसेवा सर्वसामान्यांसाठी बंद करण्यात आली होती. आता जनजीवन पूर्वपदावर येत असून कोरोना स्थिती देखील आटोक्यात येत आहे. त्यामुळे लोकल प्रवासाची मुभा सर्वसामान्यांना मिळावी अशी मागणी जोर धरू लागली आहे.
महत्वाच्या बातम्या
- पोलिसांना मिळणार हक्काचे घर ; जितेंद्र आव्हाडांचे पोलीस कुटुंबांना आश्वासन
- ‘नागरिकांनी ‘या’ अफवांवर विश्वास ठेवू नये’, मंत्री अशोक चव्हाण यांचे आवाहन
- ‘ते जर अमजद खान असतील तर…’ ; आशिष शेलारांचा पटोलेंना टोला
- काँग्रेसचा भाजपला धक्का; पटोलेंच्या उपस्थितीत भाजप कार्यकर्त्यांचा काँग्रेसमध्ये प्रवेश
- ‘सर्वसामान्यांसाठी लोकल ट्रेन सुरु करा अन्यथा…’ ; दरेकरांचा सरकारला इशारा


