🕒 1 min read
नांदेड : नांदेड जिल्ह्यात भूकंपाचे हादरे बसले असल्याची माहिती समोर येते आहे. नांदेड परिसरामध्ये भूकंपाचा सौम्य धक्का जाणवला असून आज सकाळी साडेआठ वाजताच्या गावात भूकंपाचा जोरदार धक्का जाणवला. यामुळे बराच वेळ घरांचे पत्रेही हलत असल्याची माहिती नागरिकांकडून देण्यात आली आहे. यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून विविध अफवांना पेव फुटले आहे.
या पार्श्वभूमीवर नांदेडचे पालकमंत्री अशोक चव्हाण यांनी नागरिकांना आवाहन केले आहे. ‘नांदेड जिल्ह्यात आज सकाळी अनेक ठिकाणी भूकंपाचे सौम्य धक्के जाणवले. उपलब्ध माहितीनुसार, या भूकंपाचा केंद्रबिंदू यवतमाळ जिल्ह्यात होता व रिश्टर स्केलवर त्याची ४.४ इतकी नोंद झाली आहे. नागरिकांनी भयभीत होऊ नये किंवा अफवांवर विश्वास ठेवू नये’ असे ट्विट चव्हाण यांनी केले आहे.
नांदेड जिल्ह्यात आज सकाळी अनेक ठिकाणी भूकंपाचे सौम्य धक्के जाणवले. उपलब्ध माहितीनुसार, या भूकंपाचा केंद्रबिंदू यवतमाळ जिल्ह्यात होता व रिश्टर स्केलवर त्याची ४.४ इतकी नोंद झाली आहे. नागरिकांनी भयभीत होऊ नये किंवा अफवांवर विश्वास ठेवू नये.
— Ashok Chavan (@AshokChavan1958) July 11, 2021
नांदेडमधील गुंज, पांगरा शिंदे, शिवपुरी, टाकळगाव, इंजनगाव, गिरगाव, कुरूंदा, इंजनगाव, म्हातारगाव, महागाव, बोराळा, डोणवाडा, सुकळी, सेलू, अंबा, कौठा, खुदनापुर, किन्होळा सह वसमत या गावांमध्ये भूकंपाचे हादरे जाणवले. नांदेडचे जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी यवतमाळ जिल्ह्यातील साधूनगर येथे भुकंपाचा केंद्र बिंदु आहे आणि त्याची तीव्रता ४.४ रिस्टरस्केल असल्याची माहिती दिली आहे.
महत्वाच्या बातम्या
- ‘ऊसतोड कामगारांना २० कोटींचा निधी म्हणजे वाझोंटी मदत’, आ.धस यांची टीका
- बीड जिल्ह्यात शिवसेनेचे १२ जुलैपासून शिवसंपर्क अभियान
- राष्ट्रगीत सुरू असताना उभे न राहणे अवमान; पण गुन्हा नाही
- बीडमध्ये भाजप अडचणीत, पदाधिकाऱ्यांचे राजीनामा सत्र सुरूच
- नांदेड, हिंगोली जिल्ह्यात भूकंपाचे हादरे, परभणीत जमिनीतून गुढ आवाज
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

