Share

‘शाळा अद्याप सुरू करू नयेत, कारण…’ ; आरोग्यमंत्री राजेश टोपेंची भूमिका

Published On: 

मुंबई : कोरोना महामारीच्या वैश्विक संकटामुळे गेल्या काही महिन्यांपासून शाळा-महाविद्यालये बंद आहेत. यामुळे मोठ्या प्रमाणात शैक्षणिक नुकसान होत असल्याचे पाहायला मिळत आहे. ऑनलाईन वर्ग सुरु असले तरी ग्रामीण भागात इंटरनेटची समस्या, प्रत्येक विद्यार्थ्याकडे स्मार्टफोन नसणे आदी बाबींमुळे विद्यार्थ्यांचे मोठं नुकसान होत आहे. मुंबई वगळता राज्यात दुसऱ्या लाटेआधी ५ वी ते १२ वीच्या शाळा-महाविद्यालये सुरु करण्यात आले होते.

यानंतर, दुसऱ्या लाटेच्या गंभीर स्थितीमुळे सर्व शाळा-महाविद्यालये बंद करण्यात आले. सध्याच्या शैक्षणिक वर्षात ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांचे नुकसान टाळण्यासाठी आता शाळा सुरु करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. येत्या १५ जुलै पासून ८ वी ते १२ वीचे प्रत्यक्ष वर्ग सुरु करण्यात येणार आहेत, अशी माहिती राज्याच्या शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी दिली होती.

परंतु आता आरोग्यमंत्री राजेश टोपे मात्र शाळा सुरु करण्यास अनुकूल नसल्याचे समोर आले आहे. ‘शाळा अद्याप सुरू करू नयेत, लहान मुलांचे लसीकरण झालेले नाही. त्यामुळे त्यांना कोरोनाच्या प्रादुर्भावाचा धोका जास्त आहे,’ असे मत आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी व्यक्त केलं आहे. तसेच 18 वर्षापेक्षा जास्त मुलांचे लसीकरण होत असल्याने महाविद्यालय सुरू करण्यास हरकत नसल्याचही ते म्हणाले. यावेळी वैद्यकीय महाविद्यालय सुरु करण्याची मागणी देखील त्यांनी केली आहे.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!