Share

‘या’ तीन युवा खेळाडूंवर प्रभावित सुरेश रैना म्हणाला…

Published On: 

मुंबई : सध्याच्या भारतीय क्रिकेट टीममध्ये नवख्या खेळाडूंची भरमार आहे. सध्या हेच खेळाडू भारतीय संघासाठी उत्तम कामगिरी करताना दिसत आहेत. अशातच भारताचा माजी क्रिकेटपटू सुरेश रैनाने या खेळाडूंची दखल घेत त्यांच्यावर भाष्य केलं आहे. काही नवख्या खेळाडूंनी टीम इंडियात आपलं स्थान पक्क केलं तर काही जण इंग्लंडमध्ये टेस्ट सीरिज खेळण्यासाठी आणि काही श्रीलंकेत वनडे आणि टी-20 सीरिजसाठी तयार आहेत.

एका वहिनीला दिलेल्या मुलाखतीमध्ये रैनाने अशाच तीन खेळाडूंची नावं घेतली, ज्यांनी त्याला प्रभावित केलं आहे. कर्नाटकचा देवदत्त पडिक्कल आणि महाराष्ट्राच्या ऋतुराज गायकवाडचा आणि अक्षर पटेल या खळाडूंच्या कामगिरीवर प्रभावित झालेल्या रैनाने यावेळी त्यांचं भरभरून कौतुक केलं आहे.

ऋषभ पंतविषयी विचारलं असता रैनाने तो वरिष्ठ खेळाडूंच्या पंक्तीमध्ये गेल्याचं यावेळी रैनानं सांगितलं आहे. ‘ऋषभ पंत मोठा झाला आहे. तो आता फक्त सिक्सच नाही तर फोरही मारायला लागला आहे,’ असं रैना म्हणाला. तसेच त्याने राहुल द्रविडच्या हाताखाली ट्रेनिंग घेतलेल्या सिराजचे देखील कौतुक केले आहे. सिराजच्या उत्तम कामगिरीचे श्रेय त्याने द्रविडला दिले आहे.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!