Share

“…तर तुम्हाला आमचे पाहुणे बनावे लागेल”, ट्रोलर्सच्या प्रश्नांना मुंबई पोलिसांचे उत्तर

Published On: 

मुंबई : महाराष्ट्रात किराणा दुकान आणि सुपर मार्केटमध्ये वाईन विक्रीसाठी (Wine Sale) उपलब्ध करून देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. जे सुपर मार्केट एक हजार स्क्वेअर फुटाच्यावर आहे. तिथे एक स्टॉल टाकून वाईन विक्रीला मुभा देण्यात येणार आहे. ठाकरे सरकारच्या (Thackeray Government) या निर्णयानंतर विरोधी पक्ष नेत्यांकडून मोठ्या प्रमाणात टीका करण्यात येत आहे. असे असतांनाच महाविकास आघाडी सरकारमधील अनेक नेत्यांनी वाईन आणि दारूमध्ये फरक असल्याचे म्हंटले आहे. यावर नेटकऱ्यांकडून वाइन पिऊन गाडी चालवू शकतो का?, असे वेगवेगळे प्रश्न विचारण्यात येत आहे. दरम्यान, नेटकऱ्यांच्या या प्रश्नांना आता मुंबई पोलिसांनी चांगलेच उत्तर दिले आहे.

काही दिवसांपूर्वी प्रसार माध्यमांशी संवाद साधत असतांना शिवसेना खासदार संजय राऊत(Sanjay Raut) म्हणाले होते की,‘वाइन म्हणजे दारू नाही. वाइनची विक्री वाढली तर त्याचा फायदा शेतकऱ्यांना मिळेल. शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करण्यासाठी आम्ही हे केले आहे. भाजप फक्त विरोध करते पण शेतकऱ्यांसाठी काहीच करत नाही’, असे संजय राऊत म्हणाले होते. राऊतांच्या या वक्तव्यानंतर नेटकऱ्यांच्या वेगवेगळ्या प्रतिक्रिया बघायला मिळाल्या.त्यामधील एका नेटकऱ्याने ‘मी वाइन पिऊन गाडी चालवली तर मुंबई पोलीस मला जवळचा बार दाखवतील की मला तुरुंगात टाकतील?’, असा प्रश्न विचारला आहे.

https://twitter.com/ShivamVahia/status/1487111688407162886?s=20&t=9MHKopGVfnY5JXTJt3WCFA

दरम्यान, नेटकऱ्यांच्या अश्या प्रश्नांना आता मुंबई पोलिसांनी प्रत्युत्तर दिले असून यासंदर्भात त्यांनी ट्विट केले आहे. ट्विटमध्ये ‘सर, एक ‘जबाबदार नागरिक’ म्हणून तुम्ही मद्यधुंद अवस्थेत बारमधून उठून ड्रायव्हर असलेल्या गाडीत बसण्याची शिफारस करतो. जर तुम्ही दारूच्या नशेत गाडी चालवली आणि ब्रेथलायझरमध्ये तुमच्या ड्रिंकमध्ये अल्कोहोलचं प्रमाण आढळलं, तर तुम्हाला आमचे पाहुणे बनावे लागेल’, असे उत्तर मुंबई पोलिसांनी दिले आहे.

महत्वाच्या बातम्या:

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!