Share

“नॉटी नामर्द, बिगडे नवाब, नन्हें पटोले…”, अमृता फडणवीसांची खोचक टीका

Published On: 

🕒 1 min read

मुंबई: विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस (Amruta Fadnavis) नेहमीच वादग्रस्त वक्तव्यांनी चर्चेत असतात. महाविकास आघाडी सरकारमधील नेत्यांवर निशाणा साधण्याचा त्या एकही मौका सोडत नाहीत. आता त्यांनी पुन्हा एकदा खोचक ट्वीट करत नाव न घेता शिवसेना खासदार संजय राऊत(Sanjay Raut) ,राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक (Nawab Malik)आणि काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले(Nana Patole) यांच्यावर अप्रत्यक्ष निशाणा साधला आहे.

“थोडक्यात उत्तर द्यावे…५० मार्क्स, नॉटी नामर्द, बिगडे नवाब, नन्हें पटोले…या जमाती एकत्रित कोठे पाहिल्या जाऊ शकतात? तसेच रिक्त स्थानाची पूर्ती करा…५० मार्क्स, _____शराब नही होती! हरामख़ोर का मतलब _____है और सुनने में आया है _____नामर्द है!” असे ट्वीट करत अमृता फडणवीस यांनी अप्रत्यक्ष टीका केली आहे.

दरम्यान राज्यात वाईनविक्रीसंबंधी निर्णयावरून भाजपकडून ठाकरे सरकारला निशाण्यावर धरले जात आहे. भाजपने या निर्णयाला जोरदार विरोध करत महाराष्ट्राला मद्यराष्ट्र बनवण्याचा घाट असल्याचे म्हटले जात आहे. तर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी वाईन आणि दारू यात जमीन आसमानचा फरक असल्याचे म्हटले आहे. विरोधी पक्षाकडून जाणूनबुजून राज्याला, महाविकास आघाडी सरकारला बदनाम केले जात असल्याचे म्हटले आहे. यावरूनच अमृता फडणवीस यांनी टीकेची झोड उठवली आहे.

तसेच काही दिवसांपूर्वी शिवसेना खासदार संजय राऊत यांनी टाइम्स ऑफ इंडिया मधील आरके लक्ष्मण यांचे एक व्यंगचित्र पोस्ट केले होते. ज्यात प्रमोद महाजन शिवसेनेचे संस्थापक अध्यक्ष बाळासाहेब ठाकरे यांचे निर्देश घेताना दिसून आले होते. यावरच भाजप नेत्या पूनम महाजन यांनी “स्वर्गीय बाळासाहेब व स्वर्गीय प्रमोदजी, या दोन मर्दांनी हिंदुत्वासाठी युती केली होती. नामर्दांसारखे कार्टून दाखवू नका.” अशी टीका संजय राऊत यांच्यावर केली होती.

महत्वाच्या बातम्या:

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!