Share

“२०१४ साली ज्यांनी युती तोडली त्या भाजपच्या नेत्यांना पूनम महाजन आता नामर्द म्हणणार का?”

Published On: 

मुंबई : शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे (Balasaheb Thackeray) यांच्या जयंतीनिमित्त २३ जानेवारी रोजी उद्धव ठाकरेंनी केलेल्या भाषणाचा २४ जाने.रोजी भाजप नेत्यांनी जोरदार समाचार घेतला होता. ठाकरे यांच्या या टीकेवर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस(Devendra Fadanvis) यांनी हल्लाबोल केला. तद्पश्चात शिवसेना खासदार संजय राऊत(Sanjay Raut) यांनी एक व्यंगचित्र ट्वीट करत भाजपला टोला लगावला. त्यानंतर राऊतांच्या व्यंगचित्रावर भाजपच्या खासदार पुनम महाजन(Poonam Mahajan) यांनी प्रत्युत्तर दिले होते.‘स्वर्गीय बाळासाहेब व स्वर्गीय प्रमोदजी, या दोन मर्दांनी हिंदुत्वासाठी युती केली होती. नामर्दांसारखे कार्टून दाखवू नका’, अशी टीका पुनम यांनी केली होती. तद्पश्चात आजच्या सामना रोखठोकच्या माध्यमातून संजय राऊत यांनी पूनम महाजन यांचा चांगलाच समाचार घेतला आहे.

लेखात राऊत म्हणाले आहेत की,‘पंतप्रधान नरेंद्र मोदी(PM Narendra Modi), अमित शहा(Amit Shah) नव्हते तेव्हा प्रमोद महाजन हे एकमेव नेते होते. त्यांना उद्योग जगतात मुक्त प्रवेश होता व महाजन यांच्यामार्फतच पक्षाला निधी मिळत असे. बाळासाहेब ठाकरेंशी त्यांचे उत्तम संबंध असले तरी बाळासाहेब जाहीरपणे भाजपचा उल्लेख ‘कमळी’ असा करून खिल्ली उडवत. तरीही दोन पक्षांत कधी कटुता आली नव्हती. जागा वाटपात ठरल्याप्रमाणे शिवसेनेचाच वरचष्मा असे. तरीही प्रत्येक निवडणुकीत भाजपच्या जागा वाटाघाटी व घासाघीस करून वाढत गेल्या.’

दरम्यान, पुढे ते म्हणाले की, आर. के. लक्ष्मण यांनी त्या काळातल्या वस्तुस्थितीचे वर्णन करणारे एक व्यंगचित्र रेखाटले होते. त्यात बाळासाहेब त्यांच्या खुर्चीवर बसले असून समोरच्या खुर्चीवर त्यांनी पाय ठेवले आहेत. समोर भाजपचे प्रमुख नेते जागा वाटपाची फाइल घेऊन उभे आहेत. पाहुण्यांसाठी असलेल्या खुर्चीवर पाय ठेवून बाळासाहेब म्हणतात, ‘या, बसा.’ बाजूला एक छोटासा स्टूल दिलाय इतकेच. या चित्राकडे व्यंग म्हणून पाहायला हवे. पण तेव्हा वस्तुस्थिती हीच होती. हे चित्र मी समाज माध्यमांवर प्रसिद्ध करताच पूनम महाजन चिडल्या व म्हणाल्या, ‘स्वर्गीय बाळासाहेब व स्वर्गीय प्रमोदजी या दोन मर्दांनी हिंदुत्वासाठी युती केली होती. नामर्दासारखे कार्टून दाखवू नका.’ पूनम महाजन या स्वर्गीय प्रमोद महाजन यांच्या कन्या. त्यांच्या भावना मी समजू शकतो, पण दोन मर्दांनी हिंदुत्वासाठी केलेली युती २०१४ साली ज्यांनी तोडली त्या भाजपच्या नेत्यांना पूनम महाजन आता नामर्द म्हणणार काय?, असा सवाल राऊत यांनी केला आहे.

महत्वाच्या बातम्या:

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!