Share

“आता रं…लोचा झाला की”, वाईनविक्री निर्णयावरील विरोधकांच्या टीकेला रुपाली पाटलांचे प्रत्युत्तर

Published On: 

मुंबई: सध्या वाईनसंबंधी निर्णयावरून राज्यात चांगलेच राजकारण तापले आहे. राज्यसरकारने मंत्रिमंडळाच्या बैठकीत वाईन विक्रीचा (Wine Sale) प्रस्ताव मंजूर केला आहे. या निर्णयानुसार वाईन आता जनरल स्टोअर तसेच सुपर मार्केटमध्ये (Wine sales in supermarkets)देखील विक्रीसाठी ठेवण्यात येणार आहे. मात्र राज्यसरकारच्या या निर्णयावरून भाजपने आक्रमक भूमिका घेतली आहे. महाराष्ट्राला मद्यराष्ट्र बनवण्याचा ठाकरे सरकारचा घाट असल्याचे भाजपने म्हटले आहे. आता यावरच राष्ट्रवादीच्या नेत्या रुपाली पाटील ठोंबरे (NCP Leader Rupali Patil Thombre) यांनी विरोधकांना चांगलेच प्रत्युत्तर दिले आहे.

“आता रं….लोचा झाला की एका ठिकाणी एक, दुसऱ्या ठिकाणी एक कसे चालणार? जनता बघत आहे. भारतातील या आधीची ‘मद्यराज्ये’ कर्नाटक, गोवा आणि उत्तर प्रदेश (तिन्ही राज्ये भाजपशासित) ही आहेत. या राज्यांत मॉल, सुपरमार्केटमधून वाईन, अंशत: बिअर विक्रीला परवानगी आहे. मायक्रोब्रेव्हरीज सुद्धा काही ठिकाणी कार्यान्वित आहेत. याशिवाय दिल्लीमध्येही मॉल, सुपरमार्केटमधून वाईन उपलब्ध असते. मात्र केरळ एकमेव असे राज्य आहे जिथे बिअर बार, वाईन शॉप नाही. तिथे स्वत: राज्य सरकार नियंत्रित पद्धतीने लीकर विक्री केली जाते.” असे ट्वीट रुपाली पाटील ठोंबरे यांनी केले आहे.

दरम्यान भापकडून जरी वाईनला विरोध केला जात असला तरी, राष्ट्रवादीच्या रुपाली पाटील ठोंबरे, उपमुख्यमंत्री अजित पवार तसेच शिवसेना खासदार संजय राऊत यांनी दारू आणि वाईनमध्ये जमीन आसमानचा फरक असल्याचे म्हटले आहे. त्यामुळे भाजपने दारू आणि वाईनमधला फरक समजून घ्यावा. असे म्हटले आहे.

महत्वाच्या बातम्या:

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!