🕒 1 min read
नागपूर : राज्याचे माजी मुख्य सचिव सीताराम कुंटे यांनी ईडीच्या जबाबात अनेक गंभीर बाबी उघड केल्या आहेत. यावर भाजप नेते तथा माजी उर्जा मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी महाविकास आघाडी सरकारवर निशाणा साधला आहे. मुख्य सचिवाने राज्य सरकारच्या प्रतिष्ठेची लक्तरे अशी जगजाहीर केली. त्यानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे शरद पवार साहेबांना काय उत्तर देतील? असा सवाल चंद्रशेखर बावनकुळे यांनी उपस्थित केला आहे.
राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख (Former Home Minister Anil Deshmukh) यांच्यावर माजी मुख्य सचिव सीताराम कुंटे (Former Chief Secretary Sitaram Kunte) यांनी गंभीर आरोप केले आहेत. सीताराम कुंटे हे सध्या मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे प्रधान सचिव आहेत.
नागपूर : राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्याबाबत माजी मुख्य सचिव सीताराम कुंटे यांनी खळबळजनक गौप्यस्फोट केला. सीताराम कुंटे हे सध्या मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे प्रधान सल्लागार आहेत. म्हणून त्यांचा खुलासा अधिक गंभीर ठरतो, असं रोखठोक मत भाजपाचे नेते चंद्रशेखर बावनकुळे (BJP leader Chandrasekhar Bavankule) यांनी व्यक्त केलंय.
आपल्या माजी मुख्य सचिवाने आणि विद्यमान प्रधान सल्लागाराने आपल्याच सरकारमधील माजी गृहमंत्र्यांबद्दल एवढी स्फोटक माहिती ईडीसारख्या जबाबदार यंत्रणेला दिली. त्यानंतर त्यावर मुख्यमंत्र्यांनी स्पष्टीकरण देणे आता आवश्यक झाले आहे. आपल्या प्रधान सल्लागाराने आपल्याच सरकारमधील एका सहयोगी पक्षाच्या प्रतिष्ठेची लक्तरे अशी जगजाहीर केली. त्यानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे माननीय शरद पवार साहेबांना काय उत्तर देतील?, असा सवाल चंद्रशेखर बावनकुळे यांनी विचारला आहे.
महत्वाच्या बातम्या
- योगी आदित्यनाथांनी देवालाही जातीचा दाखल देऊन टाकला-जितेंद्र आव्हाड
- “…तर दंड घेण्याचा अधिकार सरकारला राहील का?”, दिग्दर्शक केदार शिंदे यांचा सवाल
- अभिजित बिचकुलेच्या ‘त्या’ वक्तव्यावर राखी सावंतची प्रतिक्रिया; म्हणाली, “माझ्या सलमानबाबत..”
- “आराम आणि टाईमपास… काम करायला केंद्र सरकार आहेच”, आ.भातखळकरांची आदित्य ठाकरेंवर टीका
- कोण कोणामुळे वाढले यापेक्षा दोघांनाही एकमेकांचा फायदा झाला हे स्वीकारणे महत्त्वाचे- संजय राऊत
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
