नवी दिल्ली : भारताचा महान खेळाडू आणि भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार महेंद्रसिंग धोनी बाबत मायक्रोब्लॉगिंग वेबसाईट ट्विटरने धक्कादायक निर्णय आज सकाळी घेतला होता. ट्विटरने धोनीच्या ट्विटर अकाऊंटवरून वेरिफाईड बॅच म्हणजे ‘ब्लू टिक’हटवली होती. ही बातमी माध्यमांमध्ये येताच ट्विटरने निळी टिक परत केली. धोनी ट्विटरवर कमी सक्रिय आहे, हे निळे टिक काढून टाकण्याचे एक कारण असल्याचेही मानले जात होते.
धोनीला भारतातील सर्वात प्रसिद्ध क्रीडा नायकांपैकी एक मानले जाते. क्रिकेटमधील निवृत्तीनंतरही धोनीच्या लोकप्रियतेत कमी झालेली नाही. धोनी सोशल मीडियावर जास्त अॅक्टिव्ह नसतो, त्यात तो ट्विटर फार कमी दिसतो. ८ जानेवारीला धोनीने शेवटचे ट्वीट केले होते. अनेकवेळा तो फक्त त्याच्या इन्स्टाग्राम खात्यावर पोस्ट शेअर करतो.
दरम्यान धोनीच्या ट्विटरवर सध्या 8.2 मिलीयन फोलोवर्स असून तो फक्त 33 लोकांना फोलो करत आहे. धोनीने खूप महिन्यांपासून कोणतही ट्विट केलं नाही. त्यामुळे त्याच्यावर हि कारवाई केली होती अशी माहिती मिळत आहे. हे लक्षात घेण्यासारखे आहे की ट्विटरच्या सत्यापन धोरणानुसार, जर कोणी त्यांचे हँडल बदलले तर निळा टिक बॅज काढला जाऊ शकतो. तसेच जर खाते सहा महिन्यांच्या कालावधीसाठी खाते निष्क्रिय असले तरीही ब्लू टिक काढले जाऊ शकते.
महत्वाच्या बातम्या
- राज ठाकरेंचे पुण्याकडे खास लक्ष; चंद्रकांत पाटलांच्या भेटीनंतर ठाकरे पुन्हा पुणे दौऱ्यावर
- भाजपची सत्ता पुणे महापालिकेमध्ये असल्यामुळे निर्बंध शिथिल करण्याबाबत राज्य सरकार दुजाभाव करतंय ?
- ‘खेलरत्नचे नाव बदलले, आता पंतप्रधानपदाचा राजीनामा देऊन जनतेची ही मागणी देखील पूर्ण करा’
- क्रीडारत्न पुरस्काराचे नाव बदलल्यानंतर संजय राऊतांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले…
- हे तर रोगट व द्वेषपूर्ण मानसिकतेचे लक्षण; भातखळकरांची टीका
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
