मुंबई : राजीव गांधी क्रीडारत्न पुरस्काराला आता हॉकीचा जादुगार समजल्या जाणाऱ्या आणि देशाला हॉकीमध्ये नावलौकिक मिळवून दिलेल्या मेजर ध्यानचंद यांचे नाव देण्यात आले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी हा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. खेलरत्न पुरस्काराला मेजर ध्यानचंद यांचं नाव दिलं जावं यासाठी आपल्या देशभरातून लोकांच्या विनंती येत होत्या असं त्यांनी ट्वीटमध्ये सांगितलं आहे. देशातील सर्वोच्च क्रीडा पुरस्कार त्यांच्या नावे देणं योग्य असल्याचाही दावा त्यांनी केला आहे.
यावर शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांनी प्रतिक्रिया दिली आहे. ‘मेजर ध्यानचंद हे महान खेळाडू आहेत. ते हॉकीचे जादूगार होते. सरकारने त्यांचे नाव दिले आहे. पण वारंवार एखाद्या योजनेची नावे बदलणे आणि त्यातून काय मिळवायचे आहे हे सरकारला माहिती आहे. ध्यानचंद यांच्या नावाला विरोध करण्याचा प्रश्नच येत नाही. त्याच्यावर टीका टिपणी होऊ नये, असे संजय राऊत यांनी माध्यमांशी संवाद साधताना म्हटले आहे.
‘क्रीडा स्पर्धेत आपल्याला जी पदके मिळतायत ते काय एखाद्या राजकीय पक्षाचे यश नाही. हे निवडणुकांचे यश नाही. हे त्या खेळाडूने, त्या त्या राज्याने केलेली मेहनत आहे. अनेक वर्षापासून त्यांच्यामागे यंत्रणा काम करते. त्या सर्वांच्या मेहनतीमधून ती पदके आपल्याला मिळत आहेत’ असे राऊत यांनी म्हटले आहे.
‘स्वतःची लाईन वाढत नसल्यास दुसऱ्याची कमी करणे ही मोदींची मानसिकता
तर दुसरीकडे मोदींच्या या निर्णयाचा राज्यातील काँग्रेस प्रवक्ते सचिन सावंत यांनी विरोध केला आहे. ‘शहीद राजीव गांधी हे देशाचे सुपुत्र व हिरो होते. त्यामुळे मोदींनी कितीही प्रयत्न केला तरी राजीवजींचे स्थान हलणार नाही. स्वतःची लाईन वाढत नाही तर दुसऱ्याची कमी करणे ही मोदींची मानसिकता आहे’ अशी टीका सावंत यांनी केली.
ते म्हणाले, राजीव गांधी खेळरत्न पुरस्काराचे नामकरण मेजर ध्यानचंद खेलरत्न होत आहे. मेजर ध्यानचंद यांचे नाव कोणत्याही ठिकाणी व पुरस्काराला देण्याचे स्वागतच आहे. त्यांच्या नावाने सर्वोत्तम खेळ पुरस्कार २००२ पासून आधी आहेच. दुर्दैवाने मोदींनी कोत्या मनोवृत्तीच्या राजकारणात त्यांचे नाव ओढले आहे. शहीद राजीव गांधी हे देशाचे सुपुत्र व हिरो होते. त्यामुळे मोदींनी कितीही प्रयत्न केला तरी राजीवजींचे स्थान हलणार नाही. स्वतःची लाईन वाढत नाही तर दुसऱ्याची कमी करणे ही मोदींची मानसिकता आहे.
तरीही जर खेळाडूंचे नाव देण्याची तात्विक भूमिका असेल तर मोदी व जेटली यांच्या नाव ज्या स्टेडियमना दिले आहे ते बदलून दिग्गज खेळाडूंचे नाव देण्याची सुरुवात करा. सरदार पटेलांचे नाव छोटं करुन हयातीतच स्वतःचे नाव स्टेडियमला देणारे मोदी निश्चितपणे याचा विचार करतील ही अपेक्षा असे ट्विट सावंत यांनी केले आहे.
महत्वाच्या बातम्या
- आता ५ वी आणि ८ वीची शिष्यवृत्ती परीक्षा ९ ऑगस्ट ऐवजी होणार ‘या’ तारखेला !
- भाजपची सत्ता पुणे महापालिकेमध्ये असल्यामुळे निर्बंध शिथिल करण्याबाबत राज्य सरकार दुजाभाव करतंय ?
- शरद पवार – भाजप नेत्यांच्या गाठीभेटी सुरूच; राजकीय चर्चांना आलं उधाण
- ठाकरे सरकारचा मोठा निर्णय, राज्यातील ५६ हजार कलाकारांना प्रत्येकी ५ हजार रुपयांची आर्थिक मदत
- हे तर रोगट व द्वेषपूर्ण मानसिकतेचे लक्षण; भातखळकरांची टीका
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
