🕒 1 min read
पुणे : राज्यातील विविध महापालिकांच्या निवडणूका या जवळ आल्या आहेत. २०२१ च्या सुरुवातीला अपेक्षित असलेल्या महापालिकांच्या निवडणूका या कोरोनामुळे पुढे ढकलण्यात आल्या आहेत. तर, पुणे, मुंबई आणि नाशिक महापालिकेच्या निवडणूका या २०२२ च्या सुरुवातीला होणे अपेक्षित आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये सत्ता मिळवण्यासाठी आता सर्वच पक्ष सज्ज झाले आहेत.
मागील काही दिवसांपासून मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे या शहरांमधील महापालिका निवडणुकांवर बारकाईने लक्ष ठेवून असून ते स्थानिक नेत्यांच्या भेटीगाठी देखील घेत आहेत. जुलैमध्ये दोन वेळा पुणे शहराचा दौरा केल्यानंतर राज ठाकरे पुन्हा एकदा पुण्याच्या दौऱ्यावर येत आहेत. विशेष म्हणजे, भाजप-मनसे युतीच्या चर्चा या वाढल्या असून आज सकाळीच भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील आणि राज ठाकरे यांची मुंबईत ‘कृष्णकुंज’वर भेट झाली.
यानंतर चंद्रकांत पाटील दिल्लीला रवाना झाले तर राज ठाकरे हे पुणे दौऱ्यावर येत आहेत. मराठवाड्यातील जिल्हाप्रमुख, तालुकाप्रमुख यांच्याशीही ते पुण्यात चर्चा करणार आहेत. संध्याकाळी सहा वाजता राज ठाकरे संवाद साधणार आहेत.
महत्वाच्या बातम्या
- आता ५ वी आणि ८ वीची शिष्यवृत्ती परीक्षा ९ ऑगस्ट ऐवजी होणार ‘या’ तारखेला !
- भाजपची सत्ता पुणे महापालिकेमध्ये असल्यामुळे निर्बंध शिथिल करण्याबाबत राज्य सरकार दुजाभाव करतंय ?
- ‘खेलरत्नचे नाव बदलले, आता पंतप्रधानपदाचा राजीनामा देऊन जनतेची ही मागणी देखील पूर्ण करा’
- क्रीडारत्न पुरस्काराचे नाव बदलल्यानंतर संजय राऊतांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले…
- हे तर रोगट व द्वेषपूर्ण मानसिकतेचे लक्षण; भातखळकरांची टीका
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
